Posts

Showing posts from May, 2022

बाणेदार छत्रपती: संभाजी महाराज

 बाणेदार छत्रपती: संभाजी महाराज       महाराष्ट्र्राचा देदीप्यमान ऐतिहासिक परंपरेत स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे आणि त्यागाचे पर्व अविस्मरणीय असेच आहे.सुमारे सव्वातीनशे वर्षे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम मूठभर इतिहासकारआणि बखरकार यांच्या लेखणीतून झाले;परंतु एकविसाव्या शतकात मात्र अमोल कोल्हे यांच्या 'स्वराज्यरक्षक संभाजी 'या मालिकेमुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा शंभूराजे यांचे शुद्ध चरित्र कळले.अर्थात या मालिकेचा जन्म होण्यापूर्वी वा सी बेंद्रे, सेतू माधवराव पगडी, शेजवलकर, इंद्रजित देशमुख, जयसिंगराव पवार, श्रीमंत कोकाटे अशा विविध इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडाचा, राज्यकारभाराच्या पद्धतीचा, चारित्र्याचा आणि पराक्रमाचा चिकित्सक अभ्यास करून खरा इतिहास समाजासमोर मांडला.      १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या पोटी जन्मलेल्या शंभूराजांच्या वयाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशी सईबाई यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ते मातृसुखाला ...