Posts

Showing posts from July, 2022

रानभाज्या

 रानभाज्या भरपूर प्रमाणात खायला हव्यात.जो निसर्गात मिळणाऱ्या शुद्ध भाज्या खातो,तो कधीच आजारी पडत नाही.पावसाळ्यात भरपूर प्रमाणात रानभाज्या उपलब्ध असतात.या रानभाज्यांचा आस्वाद सर्वांनी घेतला पाहिजे.माझे आईबाबा नेहमी म्हणायचे,"फिरल तो चरल". रानावनात जो फिरत राहतो, त्याला निसर्ग उपाशी ठेवत नाही. बाजारात मिळणाऱ्या भाज्या आणि निसर्गात मिळणाऱ्या शुद्ध भाज्या यांत फरक आहे.बाजारातील भाज्यांवर वेगवेगळी कीडनाशके फवारलेली असतात.या कीडनाशकांचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो.अशा भाज्या विशिष्ट प्रक्रिया करून खाणे आवश्यक असते;पण निसर्गात मिळणाऱ्या भाज्या म्हणजे बावनकशी सोनं होय.शुद्ध चोवीस कॅरेट.रानभाज्या भरपूर खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.शरीरास आवश्यक असणारी खनिजे रानभाज्यांमधून मिळतात.हाडे मजबूत बनतात.म्हणून रानभाज्या भरपूर खा आणि निरोगी राहा.