बुद्ध जयंती
उद्या असणाऱ्या गौतम बुद्ध जयंतीनिमित्त लेख.. *जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज!* ----------------------------- -डॉ.श्रीमंत कोकाटे ----------------------------- तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ईसपू. 563 साली लुम्बिनी या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुध्दोदन तर आईचे नाव महामाया होते. मातेचे सातव्या दिवशी निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ मावशी तथा सावत्र माता गौतमीने अत्यंत प्रेमाने केला. बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते. *अशक्य कार्य सिद्धीस नेणारा म्हणजे सिद्धार्थ होय*. तसेच त्यांना *भगवा* या नावानेदेखील ओळखले जात असे. भगवा म्हणजे महान. भगवा हा पाली भाषेतील शब्द आहे. कारुण्य आणि प्रेम यांनी त्यांचे व्यक्तिमत्व ओतप्रोत भरले होते. सिद्धार्थला त...