Posts

Showing posts from August, 2023

राष्ट्रीय क्रीडा दिन

 .....*राष्ट्रीय क्रीडा दिन*....... ...... मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.मेजर ध्यानचंद हे हॉकी खेळातील वादळ होते.१९२८,१९३२, आणि १९३६ या सलग तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताने सुवर्ण पदक पटकाविले ते मेजर ध्यानचंद यांच्या जादूमय खेळामुळे .मेजर.ध्यानचंद यांच्या जादूमय खेळाची जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष हिटलर यांनाही भूरळ पडली होती . त्यांनी ध्यानचंदन यांना सैन्यात मोठं पद देऊ केले होते.त्याचबरोबर जर्मनीच्या संघातून खेळण्यासाठी ऑफर दिली होती पण ती ऑफर ध्यानचंदन यांनी नाकारली.मी भारताचे मीठ खाल्लं आहे.भारतातर्फेच खेळणार आहे असे ठणकावून सांगितले होते.राष्ट्रभक्ती आणि खेळ या दोन्ही गोष्टी ध्यानचंदकडे होत्या.म्हणूनच ते अजरामर आहेत. आपण मुलांना शाळेत आणि घरी सुद्धा खेळण्यासाठी पुरेसा वेळ देतो का? मुलांनी भरपूर खेळले पाहिजे आणि भरपूर अभ्यासही केला पाहिजे.आजकाल एकुलत्या एक मुलांचे पालक हेच त्या मुलांची समस्या बनत आहेत.आजकालची मुलं खूप दमवतात.ती खूप चिडचिडी आहेत.आदळआपट करतात.शांत बसत नाहीत.वगैरे अनेक तक्रारी पालक सांगत अ...