Posts

Showing posts from December, 2023

मुले,शाळा आणि गृहपाठ

 ...............................🎯 *मुले, शाळा आणि गृहपाठ*         महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी नुकतेच शाळकरी मुलांना पुरेशी झोप मिळत नाही,याकडे राज्यशासन, शिक्षण विभाग आणि शिक्षक यांचे लक्ष वेधले आहे.याबाबत राज्यपालांनी दोन बाबींकडे लक्ष वेधून घेतले आहे.एक शाळांच्या वेळा आणि दोन मुलांना दिला जाणारा अभ्यास(गृहपाठ)होय.           खरे तर मुलांच्या मानसिक स्थितीवर त्यांचा बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक विकास अवलंबून असतो.म्हणूनच मुलांच्या मानसिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही,याचा विचार शासन, शिक्षण विभाग आणि शाळा स्तरावर झाला पाहिजे.              सकाळची शाळा म्हणजे मुलांच्या दृष्टीने आनंदाची पर्वणीच होय;योगा, कवायत करताना मुलांना आनंद वाटत असतो;पण सकाळच्या शाळेची जी वेळ आहे,ती वेळ पाहून मुलांच्या अंगावर काटा येतोय. ही वास्तवता नाकारून नाही चालत.सकाळी सातच्या शाळेला जाण्यासाठी मुलांना सहा पूर्वी अर्धवट झोपेतून उठावे लागते.प्रातर्विधी वेळेत उरकणे,अंघोळ करणे या साध्या साध्या गोष्टी आहेत ,पण त्य...