Posts

Showing posts from February, 2024

दुबई दर्शन...एक अविस्मरणीय प्रवास

 दुबई दर्शन....         एक अविस्मरणीय प्रवास...         आमच्या लहानपणी कधी कधी मोठी माणसं मुंबईला जात. मग ही मुंबई रिटर्न माणसं गल्ली बोळातून 'मी जिवाची मुंबई कशी केली ?' याच गप्पा मारत फिरत असत. त्यामुळे त्यावेळी एक म्हण रूढ झाली होती, "जिवाची मुंबई एकदा तरी करावी". आज परिस्थिती बदलली आहे. जग खूप जवळ आले आहे. काळाच्या ओघात म्हणी पण बदलल्या आहेत. 'जन्माला यावे आणि एकदा तरी दुबई पाहायला जावे' ही म्हण समाजात अधिक रुजत आहे.            काय आहे त्या  दुबईत ? संपूर्ण जगातील पर्यटक ज्या ठिकाणी भेट देतात, ते ठिकाण म्हणजे दुबई, मलाही दुबईला जाण्याचा योग आला तो मित्रमंडळींच्या आग्रहाखातर. कोल्हापुरच्या 'Heaven Travellers' यांनी 16 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत 'दुबई- अबुधाबी' सहल आयोजित केली होती. यात आम्ही सामील झालो. माफक दर आणि नियोजनबद्ध कार्यवाही, यासाठी Heaven Travellers प्रसि‌द्ध आहे. रज बुगडे, वर्षा बुगडे, संकेत पानारी आणि स्नेह‌ल या सर्व मंडळींनी खूप मोठे सहकार्य केल्यामुळेच आमची दुबईवारी यशस्वी झा...