नागपंचमी
नागपंचमी हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात.नागपंचमीच्या बाबतीत भारतात अनेक प्राचीन आख्यायिका आहेत.अनेक लहानमोठ्या संस्कृतींचा मिलाफ म्हणजे भारतीय संस्कृती होय.प्रत्येक संस्कृतीचे एक दैवत असे.त्याची ते पूजा करत असत. नागा संस्कृती ही त्यांतीलच एक संस्कृती आहे.नागा लोक नागाची पूजा करतात . प्राचीन काळी सांस्कृतिक संघर्ष जसा झाला,तसे सांस्कृतिक विलिनीकरण सुद्धा झाले.तमाम भारतीयांनी नागा संस्कृती कडून नागपंचमीचा सण घेतला.नागा लोक महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी राहत होते.पन्हाळगडावर सुद्धा त्यांचे वास्तव्य होते.पराशर ऋषींच्या काळात नागा संस्कृती आणि स्थानिक लोक यांच्यात संघर्ष झाला होता.आजही आपल्या समाजात नागा लोक राहत आहेत;पण त्यांचे अस्तित्व स्वतंत्र असे नाही. नागा संस्कृतीकडून आलेला नागपंचमी हा सण भारतात आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात हा सण स्त्रीप्रधान आहे.या दिवशी स्त्रिया महाराष्ट्रीय वेशभूषा परिधान करतात.भावाचा(नागाचा) उपवास धरतात.वडाच्या पारंब्यांना झोके बांधून झोके घेतात.नागाची मनोभा...