नागपंचमी

 नागपंचमी हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात.नागपंचमीच्या बाबतीत भारतात अनेक प्राचीन आख्यायिका आहेत.अनेक लहानमोठ्या संस्कृतींचा मिलाफ म्हणजे भारतीय संस्कृती होय.प्रत्येक संस्कृतीचे एक दैवत असे.त्याची ते पूजा करत असत. नागा संस्कृती ही त्यांतीलच एक संस्कृती आहे.नागा लोक नागाची पूजा करतात . प्राचीन काळी सांस्कृतिक संघर्ष जसा झाला,तसे सांस्कृतिक विलिनीकरण सुद्धा झाले.तमाम भारतीयांनी नागा संस्कृती कडून नागपंचमीचा सण घेतला.नागा लोक महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी राहत होते.पन्हाळगडावर सुद्धा त्यांचे वास्तव्य होते.पराशर ऋषींच्या काळात नागा संस्कृती आणि स्थानिक लोक यांच्यात संघर्ष झाला होता.आजही आपल्या समाजात नागा लोक राहत आहेत;पण त्यांचे अस्तित्व स्वतंत्र असे नाही.

    नागा संस्कृतीकडून आलेला नागपंचमी हा सण भारतात आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात हा सण स्त्रीप्रधान आहे.या दिवशी स्त्रिया महाराष्ट्रीय वेशभूषा परिधान करतात.भावाचा(नागाचा) उपवास धरतात.वडाच्या पारंब्यांना झोके बांधून झोके घेतात.नागाची मनोभावे पूजा करतात.दुधाचा ,लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.घरोघरी नागोबाचे पूजन केले जाते.

         नाग हा केवळ शेतकऱ्यांचाच मित्र नाही,तर सर्वांचा मित्र आहे.तो शेतातील उंदरांवर नियंत्रण ठेवून,पिकांचे रक्षण करतो.नाग हा मांसाहारी प्राणी आहे.तो दूध पित नाही.त्याला कान नसतात.सापाला ऐकू येत नाही.पण त्याचे स्पर्शेंद्रिय खूप संवेदनशील असते. जमिनीच्या आणि हवेच्या कंपनावरून त्याला शत्रूची चाहूल लागते आणि तो सावध होतो.सापाचा मेंदू खूप लहान असतो.त्यामुळे त्याला स्मरणशक्ती खूप कमी असते.त्यामुळे साप डूक धरतो,अशी लोकांची समजूत आहे ती चुकीची आहे...

     सापांच्या विषाचे खूप उपयोग आहेत.कर्करोग, कुष्ठरोग बरे करण्यासाठी सापाच्या विषापासून बनवलेले औषध वापरतात.एख्याद्या माणसाला विषारी साप चावला असेल तर,त्याच्याच विषयापासून बनवलेले प्रतिबंधक औषध इंजेक्शन म्हणून वापरतात....

     जैवविविधतेत नागाचे तसेच सर्वच प्रकारच्या सापांचे महत्त्व खूप आहे.म्हणून सापांचा आदर करा.त्यांना मारू नका..

नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...


Comments

  1. नागपंचमी सणाविषयी माहिती देणारा उपयुक्त लेख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

श्रीकृष्ण जन्माष्टमी