Posts

Showing posts from January, 2023

माझी आई-माझे दैवत

  माझ्या आईचे 10 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षी निधन झाले.माझ्या आईचे वयाच्या पंधराव्या वर्षी माझ्या पस्तीस वर्ष वयाच्या वडिलांशी लग्न झाले.माझ्या वडिलांचा हा पुनर्विवाह होता.कसलीही कुरकुर न करता माझ्या आईने संसाराला सुरुवात केली. आई स्वातंत्र्य पूर्व काळात पहिली शिकली होती.तिचा वर्गात पहिला क्रमांक होता.वर्गात सर्वात हुशार आणि चुणचुणीत होती.शेळ्यामेंढ्या राखण्यासाठी आईला शाळा सोडावी लागली होती.         आईचे माहेर आणि सासर एकाच गावात.सावर्डे पाटणकर हे आमचे गाव.तिचे माहेरच्या माणसांवर प्रचंड प्रेम असायचे.माहेरची माणसं घरी आली की आई खूश असायची.त्यांना चहापान लगेच करायची. तिचा सहा सुनांवरही वचक होता.चार भिंतीच्या आत तिचा एक हाती वट होता.कधी कधी ती सुनांवर हुकमत गाजवायची.यांतून सुनांवर अन्याय होत आहे हे तिच्या लक्षात यायचे नाही.            आईला तीन मुली आणि सहा मुलगे झाले.स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या माझ्या आईचे लग्न स्वातंत्र्य पूर्व काळातच झाले.नऊ भावंडात माझा आठवा क्रमांक लागतो. वयाच्या स...