शिक्षण प्रवाहातील वाहता झरा

 *शिक्षण प्रवाहातील वाहता झरा - मान.श्री.संभाजी पाटील गुरुजी*


*विद्यामंदिर पंडेवाडी शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये अनेक शिक्षकांचे फार मोलाचे योगदान आहे.फार मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध नसतानाही  स्वतःला मुलांच्या शैक्षणिक वृद्धीसाठी झटणाऱ्या शिक्षकांमध्ये श्री.संभाजी पाटील गुरुजींचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल.*

*श्री. सी. धों.पाटील गुरुजींचा वारसा श्री.संभाजी पाटील गुरुजींनी पुढे सुरू ठेवला आणि विद्यामंदिर पंडेवाडी शाळेचा नावलौकिक दूरवर पसरला. स्कॉलरशिप तर गुरुजींचा हातखंडा.विद्यामंदिर पंडेवाडी शाळेत असताना गुरुजींनी अनेक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आज स्वतः च्या  क्षेत्रात खूप उत्तम काम करीत आहेत. गुरुजींनी आमच्या शाळेस मिळवून दिलेला नाव लौकिक आम्ही ग्रामस्थ कधीही विसरणार नाही.*

*आमच्या गावातील अनेक विद्यार्थांना स्वतः च्या पायावर उभे राहण्याचे बळ गुरुजींनी दिले.आज त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत.त्यांनी प्रवाहित केलेल्या शिक्षण गंगेत ज्याना ज्याना डुंबण्याचे भाग्य मिळाले,ते खूप सुदैवी म्हणावे लागतील.*

*आमच्या शाळेच्या शैक्षणिक वाढीसाठी गुरुजींनी खूप मेहनत घेतली.गावातील प्रतिष्ठित सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या व ग्रामस्थांच्या  सहकार्याने शाळेमध्ये आमूलाग्र बदल घडवला,याची आठवण वेळोवेळी येत राहते.*

*गुरुजींचे निवृत्तीनंतरचे आयुष्य खूप आरोग्यदायी,आनंदी व सुखी समाधानी जाऊ दे,यासाठी आम्हा सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा!*


*श्री. बाजीराव गोपाळ आरडे*

*अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती,*

*विद्यामंदिर पंडेवाडी*

*(सदरचा लेख सर्व पालकवर्ग यांच्या वतीने दिलेला आहे.)*

Comments

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

श्रीकृष्ण जन्माष्टमी