सदाव्यस्त आमचे मुख्याध्यापक
*सदाव्यस्त आमचे मुख्याध्यापक*
पाच वर्षांपूर्वी आमच्या शाळेला एक नवीन मुख्याध्यापक आले.त्यांच्याबद्दल आम्हाला खूप कुतूहल वाटायचं.ते म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित श्री संभाजी पाटील..! स्वभावाने खूप प्रेमळ, स्वच्छताप्रिय अत्यंत शिस्तप्रिय, स्वच्छ आणि निर्मळ मनाचे, तितकेच कडक, प्रामाणिक आणि रागीट सुद्धा....!
आमच्या मुख्याध्यापकांबद्दल बोलावे तितके थोडेच आहे.इतके विविध प्रकारची अंगे त्यांच्यात आहेत.सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत ते सतत बिझी असतात.इंग्रजी, विज्ञान, मराठी, इतिहास असा कोणताही विषय ते शिकवायला लागले की त्यांचा तास संपूच नये असे वाटत होते.प्रत्येक विषय मनापासून शिकवणार, तसेच शाळेतील इतर कोणतेही काम करण्यात माघार असायची नाही.नळ दुरूस्त करणे, मुलांबरोबर स्वच्छता करणे, बागकाम करणे, खेळात तर सर्वात पुढे असणारे स्वतःची सर्व कामे स्वतःच करणारे, सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारे , कोणत्याही कामात कसूर खपवून न घेणारे असे आमचे 'दबंग' मुख्याध्यापक आमचेच काय संपूर्ण गावचे लाडके आहेत.
आमचे मुख्याध्यापक शाळेतील कामे खूप आवडीने करतात,घरची कामे सुद्धा करतात. शाळेत पाऊल पडले की आजूबाजूला नजर टाकणार आणि शाळेच्या आवारात कुठे कचरा पडला आहे का पाहणार.आमची शाळा स्वच्छ आणि नीटनेटकी आहे ती आमच्या मुख्याध्यापकांमुळे ! प्रत्येक वर्गात डस्टबिन आहे का ते स्वतः पाहणार..वर्ग स्वच्छ आहे का ते पण पाहणार.... अजून साफसफाई कुठे नाही असे न म्हणता, बाळांनो, इकडे या, आपण सफाई करूया असे म्हणून मुलांसोबत काम करणार..!रोज दुपारी अगदी आवडीने सर्व शिक्षकांना चहा करून देणार! सर्वांवर प्रेम करणारे;पण कधी कधी मनासारखं काम नाही झाले तर रागावणारे, कोणत्याही कामात घोळ नको म्हणून सगळे कसे व्यवस्थित झाले पाहिजे अशी अपेक्षा सर्वांकडे ठेवणारे आणि स्वतः सर्व कामात पुढे असणारे आमचे मुख्याध्यापक आम्हाला लाभले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
मुलांवर जिवापाड प्रेम करणारे,मुलांचे अभ्यासात दुर्लक्ष होऊ नये म्हणून सतत जागृत असणारे आणि प्रत्येक विषय आनंदाने शिकवणारे मुख्याध्यापक कुणाला नाही आवडणार.....!! विज्ञान विषय तर प्रयोगासह आम्हाला शिकवला आहे. माझ्या दीदीचा विज्ञान विषय सरांमुळेच पक्का झाला आहे.
मैदानावर तर सरांना उत्साह संचारला असायचा.प्रत्येक खेळात स्वतः भाग घेऊन मुलांच्यात आवड निर्माण करायचे.मुलांनी शालेय शिक्षण एन्जॉय करत शिकले पाहिजे.त्यांचे बालपण न हरवता शिकले पाहिजे असे त्यांना वाटायचे. आमच्या पैकी कोणी नाराज असले तर त्यांची नाराजी गोड गोड बोलून घालवायचे.कोणत्याही बाबतीत आपल्या शाळेची मुलं मागे राहिली नसली पाहिजेत असे त्यांना वाटते.आमचे मुख्याध्यापक सर्व मुलामुलींना आपले मित्र समजतात.त्यांच्याबरोबर बोलायला कुणालाही संकोच वाटत नाही.कधीही कोणत्याही मुलांकडून जबरदस्तीने काम करून घेत नाहीत. जास्त वेळ कोणत्याही मुलाशी अबोला न धरणारे.कुणाचं काही चुकलं तर sorry बोलल्यावर लगेच माफ करणारे मुख्याध्यापक, शिक्षक, मित्र आम्हाला भेटले हे आमचे भाग्यच आहे.
आमचे सर मजेत आले की आपल्या लहानपणीच्या गोष्टी आम्हाला सांगायचे.आम्हाला त्या गोष्टी खूप आवडायच्या.त्यांनी लिहिलेली पुस्तके आमच्या शाळेच्या वाचनालयात आहेत..ती आम्ही आवडीने वाचतो.त्या पुस्तकांमधून आम्ही खूप काही शिकलोय.आमच्या सर्वांबद्दल जेवढं लिहावं तेवढं थोडंच आहे. Thanku so much sir, you have come to my school and life.आमच्याकडून काही चुकलं असेल तर...so sorry sir,so sorry sir.. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा......!
मानसी बागडी
इयत्ता आठवी, विद्या मंदिर तिटवे*सदाव्यस्त आमचे मुख्याध्यापक*

इयत्ता आठवी, विद्या मंदिर तिटवे
Comments
Post a Comment