रश्मीज् स्माईल ट्रस्टचे योगदान
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*... रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून सरकारी शाळांना दहा लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप*
*___रश्मीज् स्माईल ट्रस्टचे योगदान
*आपल्या राज्यातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या पवित्र नगरीत राधानगरी, करवीर,कागल, भुदरगड तालुक्यातील अनेक शाळांना रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून स्मार्टबोर्ड, कम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, फुटबॉल, रिंगा, स्किपिंग रोप्स, बॅडमिंटन रॅकेट, स्कूल बॅग्ज, वह्या, प्रयोगशाळा साहित्य, सॅनिटरी पॅड्, कलरबॉक्स असे विविध प्रकारचे पंचवीस लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य गेल्या तीन-चार वर्षांत मिळाले आहे.याकामी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ विकास पोतदार, सेक्रेटरी डॉ भावना कुचेरिया, प्रोजेक्ट ॲड्व्हायझर, डॉ सुहास कुचेरिया, प्रोजेक्ट इन्चार्ज मा.सोहिल शाह या आणि इतर मान्यवर मंडळींनी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद*
*२५ सप्टेंबर २०२३रोजी राधानगरी तालुक्यातील अठरा शाळांना आणि करवीर व कागल शाळेतील प्रत्येकी एका शाळेला रश्मीज् स्माईल ट्रस्ट, मुंबई यांच्या मार्फत सुमारे दहा लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यांमध्ये संगणक संच, प्रयोगशाळा, खेळाचे साहित्य, नोटबुक, कंपास, प्रिंटर असे विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यासाठी रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या सेक्रेटरी डॉ. भावना कुचेरिया, प्रोजेक्ट ॲड्व्हायझर डॉ.सुहास कुचेरिया, प्रोजेक्ट इन्चार्ज मा.सोहिल शाह , मा.चेतन मेहता, ज्यांनी या सर्व शाळांची शिफारस केली होती ते पंचायत समिती राधानगरीचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी, राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित श्री संभाजी पाटील या सर्वांनी स्वतः प्रत्येक शाळेला भेट देऊन शैक्षणिक साहित्य वाटप केले.त्यामुळे शाळांचा आणि मुलांचा आनंद द्विगुणित झाला*.
*या वर्षी खऱ्या अर्थाने हा आनंद द्विगुणित करण्यासाठी ट्रस्टच्या सन्माननीय सदस्या श्रीमती प्रफुल्ला प्रभुभाई कसुंद्रा यांनी या सर्व शाळांना दिलेल्या शैक्षणिक साहित्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला.श्रीमती दिव्याताई कसुंद्रा आणि श्रीमती मंजुळाताई कसुंद्रा यांच्या स्मरणार्थ हा सर्व निधी उपलब्ध करून दिला. श्रीमती प्रफुल्ला प्रभुभाई कसुंद्रा यांना सर्व शाळांच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. त्याच बरोबर आपले नाव कुठेही न येऊ देता सढळ हाताने मदत करणारे या संस्थेचे सन्माननीय सदस्य कोटी कोटी धन्यवाद आणि अशाच नामोल्लेख न करता मदत करणाऱ्या या संस्थेच्या सदस्यांना खूप खूप धन्यवाद.
*रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना विद्या मंदिर येवती, चंद्रे, मजरे कासारवाडा, बोरवडे,वारके हायस्कूल तुरंबे, मांगोली, शाहू हायस्कूल कासारवाडा पाटणकर, सावर्डे पाटणकर, धामणवाडी, कुडुत्री,गुडाळ, तळगाव, पडसाळी, कोनोली-आसंडोली, सावतवाडी, मानेवाडी आणि कोते या वीस शाळांना भेट देण्याचा योग आला.अनेक शाळांनी खूप चांगल्याप्रकारे आणि हृदयातून स्वागत केले.येवती, बोरवडे ,गुडाळ, सावर्डे पाटणकर,वारके हायस्कूल तुरंबे,मजरे कासारवाडा, परशुराम विद्यालय राशिवडे मानेवाडी या आणि इतर सर्वच शाळांनी केलेल्या स्वागताने मन भरून आले.येवती ग्रामपंचायतने गेल्या दोन वर्षांत शाळेसाठी ३३ लाख रुपयांचा निधी खर्च केला.बोरवडे शाळेत तर संपूर्ण गावच शाळेत जमा झाले होते.येथे शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते व्यासपीठावर जाईपर्यंत जाता जाता विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम दाखवून बोरवडे शाळेने ट्रस्टचे मन जिंकले.*
*सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत आणि गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार आणि संगणकीय शिक्षण मिळाले पाहिजे .या हेतूने दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा शाळा पुरेपूर वापर निश्चितच करतील. वीस शाळांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ट्रस्टच्या सेक्रेटरी डॉ भावना कुचेरिया यांना सावित्रीबाई फुले रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,तर डॉ सुहास कुचेरिया आणि सोहिल शाह यांना महात्मा फुले रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला पंचायत समिती राधानगरीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा बी एम.कासार साहेब, सावर्डे पाटणकर गावचे सरपंच श्रीमती सुमन मोरे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.मा.कासार साहेब यांनी ट्रस्टच्या योगदानाबद्दल कौतुक केले आणि तालुक्याच्या वतीने धन्यवाद दिले.या पुरस्काराने ट्रस्टचे सर्वच सन्मानीय सदस्य भारावून गेले.*
*दीनबंधू मंडळ मुंबई चे अध्यक्ष मा कीर्ती मेहता त्यांनी आम्हाला चार वर्षांपूर्वी आम्हाला रश्मीज् स्माईल ट्रस्टची ओळख करून दिली होती.ती खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे समाधान लाभले.विविध शाळांना भेटी देत असताना काही शाळांमध्ये प्रत्यक्ष जाता आले नसले तरी नजिकच्या काळात निश्चितच या शाळांना भेट दिली जाईल. या वीस शाळांमध्ये अनेक उत्तम दर्जाचे विज्ञान शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक, क्रीडा शिक्षक आहेत.म्हणूनच या शाळांची निवड करण्यात आली आहे. मुलांना संगणक साक्षर बनवणे,विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष मुलांनी हाताळणे आणि हे शिकत असताना खेळाचाही पुरेपूर आनंद घेणे या उद्देशाने दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा शाळा पुरेपूर वापर करतील अशी आशा आहे.सर्व शाळांना खूप खूप शुभेच्छा.*
*शब्दांकन: संभाजी पाटील राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित, माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राधानगरी
Comments
Post a Comment