https://shorturl.at/tJhbehttps://shorturl.at/tJhbe
Posts
दुबई दर्शन...एक अविस्मरणीय प्रवास
- Get link
- X
- Other Apps
दुबई दर्शन.... एक अविस्मरणीय प्रवास... आमच्या लहानपणी कधी कधी मोठी माणसं मुंबईला जात. मग ही मुंबई रिटर्न माणसं गल्ली बोळातून 'मी जिवाची मुंबई कशी केली ?' याच गप्पा मारत फिरत असत. त्यामुळे त्यावेळी एक म्हण रूढ झाली होती, "जिवाची मुंबई एकदा तरी करावी". आज परिस्थिती बदलली आहे. जग खूप जवळ आले आहे. काळाच्या ओघात म्हणी पण बदलल्या आहेत. 'जन्माला यावे आणि एकदा तरी दुबई पाहायला जावे' ही म्हण समाजात अधिक रुजत आहे. काय आहे त्या दुबईत ? संपूर्ण जगातील पर्यटक ज्या ठिकाणी भेट देतात, ते ठिकाण म्हणजे दुबई, मलाही दुबईला जाण्याचा योग आला तो मित्रमंडळींच्या आग्रहाखातर. कोल्हापुरच्या 'Heaven Travellers' यांनी 16 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत 'दुबई- अबुधाबी' सहल आयोजित केली होती. यात आम्ही सामील झालो. माफक दर आणि नियोजनबद्ध कार्यवाही, यासाठी Heaven Travellers प्रसिद्ध आहे. रज बुगडे, वर्षा बुगडे, संकेत पानारी आणि स्नेहल या सर्व मंडळींनी खूप मोठे सहकार्य केल्यामुळेच आमची दुबईवारी यशस्वी झा...
मुले,शाळा आणि गृहपाठ
- Get link
- X
- Other Apps
...............................🎯 *मुले, शाळा आणि गृहपाठ* महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी नुकतेच शाळकरी मुलांना पुरेशी झोप मिळत नाही,याकडे राज्यशासन, शिक्षण विभाग आणि शिक्षक यांचे लक्ष वेधले आहे.याबाबत राज्यपालांनी दोन बाबींकडे लक्ष वेधून घेतले आहे.एक शाळांच्या वेळा आणि दोन मुलांना दिला जाणारा अभ्यास(गृहपाठ)होय. खरे तर मुलांच्या मानसिक स्थितीवर त्यांचा बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक विकास अवलंबून असतो.म्हणूनच मुलांच्या मानसिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही,याचा विचार शासन, शिक्षण विभाग आणि शाळा स्तरावर झाला पाहिजे. सकाळची शाळा म्हणजे मुलांच्या दृष्टीने आनंदाची पर्वणीच होय;योगा, कवायत करताना मुलांना आनंद वाटत असतो;पण सकाळच्या शाळेची जी वेळ आहे,ती वेळ पाहून मुलांच्या अंगावर काटा येतोय. ही वास्तवता नाकारून नाही चालत.सकाळी सातच्या शाळेला जाण्यासाठी मुलांना सहा पूर्वी अर्धवट झोपेतून उठावे लागते.प्रातर्विधी वेळेत उरकणे,अंघोळ करणे या साध्या साध्या गोष्टी आहेत ,पण त्य...
हेमंत करकरे-खरा देशभक्त
- Get link
- X
- Other Apps
....... *हेमंत करकरे - खरा देशभक्त* २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून हाहाकार उडवून दिला होता. ती घटना आजही महाराष्ट्रीयन विसरलेले नाहीत. तत्कालीन एटीएस प्रमुख (दहशतवाद विरोधी पथक प्रमुख) हेमंत करकरे यांच्याकडे सर्व सूत्रे होती. हेमंत करकरे स्वतः मैदानात उतरून लढले होते. यांतच त्यांचे बलिदान गेले होते. पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी मुंबई समुद्रकिनारपट्टीवर आल्यावर तेथील नौका ताब्यात घेतली, नावाड्याने गेट वे ऑफ इंडिया' जवळ आणून सोडल्यावर त्याला गोळी बालून मारले आणि दहशतवादी ताज हॉटेलात शिरले. काही दहशतवादी 'हॉटेल ओबेरॉय' च्या दिशेने गेले आणि अंधाधुंद गोळीबार सुरु झाला; पण त्याच वेळी मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट चालू होता. करकरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामा हॉस्पिटल कडे जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. आदेशाचे तंतोतंत पालन करत करकरे, विजय साळसकर, कामटे इत्यादी मंडळी कामा हॉस्पिटलकडे निघाली. कामा हॉस्पिटलच्या परिसर...
संविधान दिन..
- Get link
- X
- Other Apps
संविधान दिन 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11महिने 18 दिवस लागले.9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते.कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या.यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे सचिव होते.डॉ.बी.एन.राव हे कायदेविषयक सल्लागार होते. याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरू,नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल,सरोजिनी नायडू अशा अनेक नामवंत बॅरिस्टर दर्जाच्या व्यक्ती संविधान सभेत सदस्य होत्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सर्वांच्या विचारविनिमयातून संविधान तयार झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाला कायदेविषयक कलमात बंदिस्त केले.संविधान सभेच्या अनेक बैठका झाल्या.दुरुस्त्यांसह 26 न...
तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.
- Get link
- X
- Other Apps
. तुलशी विवाह - एक अनिष्ट प्रथा. परंपरा, संस्कृती, उत्सव, प्रथा या गोष्टी भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. यातून आनंद मिळतो, सांस्कृतिक वारसा मिळतो. हे जरी खरे असले, तरी काही प्रथांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. काही प्रथा,परंपरा इतिहासाच्या साक्षीदार म्हणून आपण जपत आलो आहोत. पण काही विकृत ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या असलेल्या परंपरा आपण जोपासत असेल ,तर मात्र आपण आपली सद्सदविवेकबुद्धी कुठेतरी गहाण ठेवली आहे, असेच म्हणावे लागेल, अशीच एक परंपरा आपण डोळ्यांवर पट्टी बांधून हजारो वर्षापासून चालवत आलो आहोत. आणि ती परंपरा म्हणजे 'तुलसी विवाह 'होय. , या तुलसी विवाहाबाबतच आपण माहिती घेणार आहोत. भारताच्या सप्तसिंधु प्रदेशात बळी वंशातील पराक्रमी राजांचे राज्य होते. त्यांनी हजारो वर्षापासून आर्यांशी म्हणजे वैदिक संस्कृतीशी संघर्ष केला आणि आपली मूल भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बंळीवंशात हिरण्याक्ष, हिरण्यक, हिरण्यकशिपू प्रल्हाद, विरोचन, कपिल, बळी, बाणासूर असे एकापेक्षा एक पराक्रमी आणि शीलवान रा...
इडा पिडा टळू दे,बळीचे राज्य पुन्हा येऊ दे
- Get link
- X
- Other Apps
........................... इडा पिडा टळू दे..बळीचे राज्य पुन्हा येऊ दे.... आमच्या लहानपणीचा म्हणजे मी साधरणतः नऊ दहा वर्षांचा असेन, त्यावेळचा प्रसंग मला आजही आठवतोय. दिवाळीत 'बलिप्रतिपदा' हा दिवस । आम्ही सकाळी लवकर लवकर उठून अंघोळ करून दारासमोरील अंगणात रांगोळी काढलेल्या ठिकाणी कडू कारिट डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचो. आमचे बाबा सर्वांत अगोदर कारिट फोडायचे. त्यानंतर मग आम्हीही डाव्या पायाच्या अंगठ्याने सर्वशक्ती पणाला लावून कारिट फोडायची. माझ्या बालबुद्धीला या प्रथेबाबत अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. मी करिट फोडून झाल्यावर बाबांना विचारले "बाबा, बलिप्रतिपदे- दिवशी कारिट का फोडतात ? आणि ते कारिट डाव्या पायाच्या अंगठ्यानेच का फोडायचे?" माझ्या या प्रश्नाला बाबांनी उत्तर दिले. "आरं, याच दिवशी विष्णूने वामनाच्या रुपात येऊन डाव्या पायाच्या अंगठ्याने बळीराजाला ठार मारले: विष्णूच्या पराक्रमाची आठवण म्हणून आपण ही प्रथा करत आहोत." बाबांच्या या उत्तराने माझे समाधान झाले नाही. म्हणून मी बाबांना आणखी प्रश्न विचारले, " बाबा, बळीराजा खूप वाईट होता का? कडू ...