संविधान दिन..

 

                      संविधान दिन

    

       26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11महिने 18 दिवस लागले.9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते.कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या.यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे सचिव होते.डॉ.बी.एन.राव हे कायदेविषयक सल्लागार होते. याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरू,नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल,सरोजिनी नायडू अशा अनेक नामवंत बॅरिस्टर दर्जाच्या व्यक्ती संविधान सभेत सदस्य होत्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सर्वांच्या विचारविनिमयातून संविधान तयार झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांनी संविधानाला कायदेविषयक कलमात बंदिस्त केले.संविधान सभेच्या अनेक बैठका झाल्या.दुरुस्त्यांसह 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान पूर्णत:तयार झाले.आणि 26 नोव्हेंबर 1950 पासून संविधानाचा अंमल सुरु झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीत जे योगदान दिले, ते अतुलनीय होते.म्हणूनच त्यांना भारताच्या संविधानाने शिल्पकार म्हणतात. भारताचे संविधान शाबूत राहणे हे संपूर्ण भारतीय लोकांच्या हिताचे आहे. संविधान दिनाच्या संपूर्ण भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.

                         संभाजी पाटील 

          राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक 

            माजी शिक्षण विस्तार अधिकारी

Comments

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

श्रीकृष्ण जन्माष्टमी