*संभाजी पाटील सर म्हणचे ,बहुजन समाजाने आचरणात आणावयाच्या मूल्यांचा ठेवा* [( *संभाजी पाटील सरांनी आयुष्यभर ह्रदय ओतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व संवर्धन आणि समाजाचे ऐश्वर्यवर्धन केले आहे*)] ({ *संभाजी पाटील सर खळाळ म्हणजे उत्साहाचा खळाळून वाहणारा निर्झर. सर म्हणजे जिवंतपणा , सळसळते चैतन्य,नित्य नवीनता व रमणीयताही*)} (( *समर्पित भावनेने सेवा बजावणारा हरहुन्नरी शिक्षक, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून देणारा बाप माणूस, क्रीडांगणावर अंगात चैतन्य संचारते असा स्पोर्ट्समन, सृजनशील व संवेदनशील लेखक, इंग्रजी -गणित- बुद्धिमत्ता - मराठी वाड्:मय यावर जबरदस्त प्रभुत्व असणारा माणूस व समाजमुख प्रशासन असणारे सतेज ,सदानंदी व सदाबहार मुख्याध्यापक म्हणजे संभाजी पाटील*)) [[ *१९८४ पासून शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यापदावर काम करत असताना मी तांदळे गुरुजी ( कन्या मलकापूर), साळोखे गुरुजी ( केंद्र शाळा माण) सदानंद कदम ( भोसे सांगली) गंगामाई विद्यालय खाजगी प्राथमिक शाळा इचलकरंजी मुख्याध्यापिका दामले मॅडम , वसंत भोसले (पद्माराजे शाळा कोल्हापूर मनपा ) व ...
. तुलशी विवाह - एक अनिष्ट प्रथा. परंपरा, संस्कृती, उत्सव, प्रथा या गोष्टी भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. यातून आनंद मिळतो, सांस्कृतिक वारसा मिळतो. हे जरी खरे असले, तरी काही प्रथांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. काही प्रथा,परंपरा इतिहासाच्या साक्षीदार म्हणून आपण जपत आलो आहोत. पण काही विकृत ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या असलेल्या परंपरा आपण जोपासत असेल ,तर मात्र आपण आपली सद्सदविवेकबुद्धी कुठेतरी गहाण ठेवली आहे, असेच म्हणावे लागेल, अशीच एक परंपरा आपण डोळ्यांवर पट्टी बांधून हजारो वर्षापासून चालवत आलो आहोत. आणि ती परंपरा म्हणजे 'तुलसी विवाह 'होय. , या तुलसी विवाहाबाबतच आपण माहिती घेणार आहोत. भारताच्या सप्तसिंधु प्रदेशात बळी वंशातील पराक्रमी राजांचे राज्य होते. त्यांनी हजारो वर्षापासून आर्यांशी म्हणजे वैदिक संस्कृतीशी संघर्ष केला आणि आपली मूल भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बंळीवंशात हिरण्याक्ष, हिरण्यक, हिरण्यकशिपू प्रल्हाद, विरोचन, कपिल, बळी, बाणासूर असे एकापेक्षा एक पराक्रमी आणि शीलवान रा...
संविधान दिन 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11महिने 18 दिवस लागले.9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते.कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या.यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे सचिव होते.डॉ.बी.एन.राव हे कायदेविषयक सल्लागार होते. याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरू,नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल,सरोजिनी नायडू अशा अनेक नामवंत बॅरिस्टर दर्जाच्या व्यक्ती संविधान सभेत सदस्य होत्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सर्वांच्या विचारविनिमयातून संविधान तयार झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाला कायदेविषयक कलमात बंदिस्त केले.संविधान सभेच्या अनेक बैठका झाल्या.दुरुस्त्यांसह 26 न...
Comments
Post a Comment