शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

 *संभाजी पाटील सर म्हणचे ,बहुजन समाजाने आचरणात आणावयाच्या मूल्यांचा ठेवा*

[( *संभाजी पाटील सरांनी आयुष्यभर ह्रदय ओतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व संवर्धन आणि समाजाचे ऐश्वर्यवर्धन केले आहे*)]

({ *संभाजी पाटील सर खळाळ म्हणजे उत्साहाचा खळाळून  वाहणारा निर्झर. सर म्हणजे जिवंतपणा , सळसळते चैतन्य,नित्य नवीनता व रमणीयताही*)}

(( *समर्पित भावनेने सेवा बजावणारा हरहुन्नरी शिक्षक, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून देणारा बाप माणूस, क्रीडांगणावर अंगात चैतन्य संचारते असा स्पोर्ट्समन, सृजनशील व संवेदनशील लेखक, इंग्रजी -गणित- बुद्धिमत्ता - मराठी वाड्:मय यावर जबरदस्त प्रभुत्व असणारा माणूस व समाजमुख प्रशासन असणारे सतेज ,सदानंदी व सदाबहार मुख्याध्यापक म्हणजे संभाजी पाटील*))

[[ *१९८४ पासून शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यापदावर काम करत असताना मी तांदळे गुरुजी ( कन्या मलकापूर), साळोखे गुरुजी ( केंद्र शाळा माण) सदानंद कदम ( भोसे  सांगली)  गंगामाई विद्यालय खाजगी प्राथमिक शाळा इचलकरंजी मुख्याध्यापिका दामले मॅडम , वसंत  भोसले (पद्माराजे शाळा कोल्हापूर मनपा ) व संभाजी पाटील ( राधानगरी) यांच्या खुर्चीवर मी कधीच बसलो नाही. कारण या सर्व  माणसांची उंची  माझ्यासारख्या अधिकाऱ्या पेक्षा खूपच उंच होती*]

{{ *गुरू मा सीताराम पाटील व शिष्य मा संभाजी पाटील दोघेही राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राधानगरी तालुक्यातील शिक्षक. महाराष्ट्रातील हे बहुधा एकमेव उदाहरण असावे.दोघेही लेखक.*}}

      *संभाजी पाटील म्हणजे आयुष्यभर शिष्यवृत्ती परीक्षेत मुलांमुलिंना यशस्वी करणारा "बेताब बादशहा"* 

      *पहिले पुस्तक छपाई करण्यासाठी सौभाग्यवती च्या गळ्यातील ' नेकलेस ' मोडणारा वेडा शिक्षक- लेखक* 

         *शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून नोकरी करता करता पालक व विद्यार्थ्यांसाठी सुमारे पंचवीस पुस्तकांचे लेखन करणारा अवलिया*

        *मराठी व इंग्रजी व्याकरणावर स्वतः ची कमांड असल्यामुळे मुलांना दिशादर्शक होतील अशी पुस्तके प्रकाशित केली आहेत.*

      *गणिताचे पट्टीचे शिक्षक असल्यामुळे भारतीय संस्कृतीचा ठेवा असणारे 'वैदिक गणित' याचे विवेचन करणारे पुस्तक लिहिले*

      *प्रचंड वाचन व चिंतन माणसाला समृद्ध बनवते. जनरल नॉलेज,नोबल पारितोषिक विजेते, असामान्य लोकांची 'ग्रेट स्पीचेस' ही पुस्तके सरांच्या वाचनाच्या आवाक्याची साक्ष देतात*

      *ऐतिहासिक किल्ले सफर या पुस्तकामुळे सरांची इतिहासची साक्ष देणाऱ्या किल्ल्याप्रती असणारी हळवी व देशप्रेमाची भावना लक्षात येते.महाराष्ट्रातीले किल्ले महाराष्ट्र मातेच्या ललाटावरील कुंकवासम आहेत.*

      *संभाजी पाटील यांनी नोकरीत स्वतः शिकवलेली जवळजवळ ११० मुले शिष्यवृत्ती परीक्षेत आणली असून.विद्यामंदिर तिटवे येथे मुख्याद्यापक म्हणून पाच वर्षे काम करताना त्यांच्या शाळेतील ७० मुले शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेत आली आहेत.*

     *संभाजी पाटील सर हे मातृभक्त होते.आईचा शब्द हा प्रमाण मानून काम करत असल्याने सर्वसामान्य मुलांच्याप्रती कनव , आपुलकी , आपलेपणा व आत्मियता‌ ही सर्व देखणी आईच्या आचरणाचीच आहे. संस्काराचा समृद्ध वारसा आईमुळे सरांकडे प्राप्त झाला आहे.*

     *संभाजी पाटील सरांच्या उत्साहाची ,आनंदाची,सजगतेची पाळेमुळे सरांच्या घरात दिसतात.संतुष्ट पत्नी ही खरीखुरी ऐश्वर्यलक्ष्मी असते. पतीच्या पुस्तक छपाई साठी गळ्यातला दागिना द्यायला मन खूप मोठे लागते. सोशिकता, समंजसपणा, साधेपणा हे गुण सरांनी पत्नी सौ शारदा यांच्याकडे  त्यांनी सरांचे आयुष्य सुमधुर करण्यासाठी आयुष्य समीधा सारखे समर्पित केले आहे*

     *सुस्वरुप व प्रज्ञावंत मुलगी म्हणजे बापाची दुसरी आई असते.सौ स्नेहल (MSc) ही सरांची दुसरी आईच आहे. बापाचा फोनवरून बोलणारा आवाज ओळखून ती बाप आजारी  आहे हे तिला समजत असते.जावई म्हणजे दुसरा मुलगाच असतो.मुलगी व‌ जावई दोघेही सुखी, समृद्ध व समाधानी आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. संभाजी पाटील सरांची मुलगी व जावई ही खरी श्रीमंती आहे*

     *संभाजी पाटील सरांचा मुलगा शुभम MSc असून LIC कंपनीत क्लासवन ऑफीसर आहे.शुभमची पत्नी सूनबाई म्हणजे पाटील कुटुंबाला सापडलेला परीस आहे.*

       *संभाजी पाटील सरांचे घर म्हणजे सहजीवन, सहभोजन, सहशिक्षण , सहजाणीव या सर्वांचे अनौपचारिक शिक्षण देणारे विद्यापीठ आहे.सरांचे घर प्रेमाने, आनंदाने, सौख्याने, सुविचाराने व सुसंस्काराने ओथंबून भरलेले आहे*

      *तुमचं भविष्य तुम्ही ठरवणार नसाल तर दुसऱ्यांच्या तालावर तुम्हाला भविष्यात नाचावे लागते हे पुरेपूर समजल्याने संभाजी पाटील सरांनी आपले भविष्य आपल्या कार्यकर्तृत्वावाने लिहिले आहे*

     *संभाजी पाटील सरांच्या मुळे शाळा म्हणजे उपक्रमांचे मोहोळ बनते.क्रीडा स्पर्धा, कुस्ती, मल्लखांब, सांस्कृतिक स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, ड्रडिशनल डे, फळभाज्या व जूने साहित्य प्रदर्शन, आठवडा बाजार, संगीत, आकाशदर्शन अशा कार्यक्रमुळे शाळा,पालक व गावाचे नातं दृढ होत असते.*

     *सरांना समाजभान असल्यामुळे सरांनी रश्मीज स्माईल ट्रस्ट द्वारे  २० ते २५ लाख रुपयांची मदत स्वतः च्या शाळेसाठी, गावातील अंगणवाडी साठी, परिसरातील शाळांसाठी मिळवून देण्यासाठी मोठा वाटा उचलला आहे. रश्मीज ट्रस्ट 'सरकारी शाळांची माय' असल्याने मायेच्या ममतेने शाळेसाठी मदत करत आहे.*

      *संभाजी पाटील सर आपणासारखा माणूस कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागास लाभल्यामुळे आपण गोरगरीबांच्या मुलांच्या आयुष्याचे सोनं केलं नाही तर कुटुंबाच्या उद्धारासाठी जणू परीसच त्यांच्या हातात दिला आहे.*

       *संभाजी पाटील सर -

*आपणास व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना जे जे हवं ते ते मिळू दे ,'भाग्यवान'  या शब्दाचा अर्थ त्या सर्वांकडे पाहताना कळू दे इतके "सद्भआग्य" आपणा सर्वांना मिळो ही परमेश्वराचे चरणी प्रार्थना.*

     *संभाजी पाटील सर आपणासास व कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही श्री महालक्ष्मीचे चरणी मनोमन प्रार्थना*

     *आपण माझ्या जीवनातील अशी व्यक्ती होतात की जिथे माझ्या हाती केवळ फुलेच आली.*

     *आपल्या सेवानिवृत्तीच्या भावपूर्ण कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा व अनेक अनेक शुभाशीर्वाद*

    *आपल्या अध्यापनावर, लेखनावर, व्यवस्थापन कौशल्यावर व  परखडपणावर निखळपणे व निरागसपणे प्रेम करणारा आपला स्नेही* - संपत गायकवाड ( माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Comments

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

श्रीकृष्ण जन्माष्टमी