सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व
सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व
राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, शिक्षक बँकेचे तज्ञ संचालक , नूतन विस्तार अधिकारी आदरणीय संभाजी गोविंद पाटील सरांची आज सेवानिवृत्ती.आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा हा दिनू. आनंद यासाठी कि सरांची दगदग कमी होऊन थोडा निवांतपणा लाभेल यासाठी. तर दुःख यासाठी कि शिष्यवृत्तीसारख्या परीक्षेतील कुटप्रश्नांची उकल करुन आमच्यासारख्या शिक्षकांना मार्गदर्शन करणारं एक उत्कृष्ट, मेहनती मार्गदर्शक व शाळेचे समर्पित हे व्यक्तिमत्त्व या प्रवाहातून थोडं बाजूला होणार म्हणून.
पाटील सरांचा आणि माझा परिचय झाला तो whatsapp च्या माध्यमातून. शिष्यवृत्तीचा whatsapp चा ग्रुप तयार झाला होता. मीही त्यावर सक्रिय झाले. कठीण प्रश्नसंबंधीत मला तिथे मार्गदर्शन मिळू लागले.आजपर्यंत शिष्यवृत्तीतील कोणताही प्रश्न तिथे अनुत्तरीत राहिला असे मला आठवत नाही. अशा या कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर दुणावत गेला.शैक्षणिक , सामाजिक आणि प्रशासकीय प्रश्नावर ही चर्चा वाढत राहिली...आणि सरांठायी असणारे विविध पैलू उलगडत गेले. सरांनी मार्गदर्शनपर मांडलेले विचार पटतातही आणि विचार करायला भागही पाडतात. त्यांच्याकडून सदैव वैचारिक खुराक मिळत असे. पण हे सारं whatsapp च्या माध्यमातूनच.
अलिकडे सरांच्या चिरंजीवाच्या विवाहाप्रित्यर्थ सरांचा व त्यांच्या कुटुंबाचा प्रत्यक्ष सहवास लाभला. आणि आम्ही धन्य झालो.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा..
या पुढचा प्रवासही हसरा
आणि आनंद देणारा असावा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
निलोफर अत्तार
विद्या मंदिर हणबरवाडी,ता करवीर
Comments
Post a Comment