ध्रुवतारा
--++++++++++
ध्रुवतारा
🙏नमस्कार,
मी सौ.स्वाती अशोक नायकवडे (कु.शुभांगी जयसिंग पाटील) रा.पंडेवाडी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मा.संभाजीराव पाटील (गुरुजी)यांची एक विद्यार्थीनी.
आमच्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाच्या परिसस्पर्शाने आयुष्यात एक व्यक्तिमत्व बनवले त्या गुरुजींच्या विषयी लिहिण्याचा एक प्रयत्न.
आयुष्यात 'गुरु ' या शब्दाला साजेस व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे गुरुजी. आयुष्यात अनेक मार्गदर्शक भेटतात पण 'गुरु ' एकच असतो जो आपल्या आयुष्याला कलाटणी देतो.तसेच अगदी बालपणापासून त्यांनी आमच्या आयुष्यात जे पेरले ते प्रत्येक चांगल्या - वाईट प्रसंगात आम्हास उपयुक्त ठरले. आपल्याकडे 'फॅमिली डॉक्टर 'ची संकल्पना पण लोकांना माहित नसेल तेव्हा मात्र आम्हाला ' फॅमिली शिक्षक ' भेटले आमचे गुरुजी. माझ्या काकांच्या श्री.सुनील पाटील (सर ) यांच्या नंतर मला ते मार्गदर्शक म्हणून मिळाले. म्हणजे आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक, दिशादर्शक, जिव्हाळ्याचे बनले. मला आठवते ते इयत्ता ४ थीचे वर्ष त्यावेळीचा स्कॉलरशिप अभ्यास. मुख्य म्हणजे आमच्यापेक्षा गुरुजींनी घेतलेले कष्ट. एखाद्या उपासका प्रमाणे गुरुजी शाळेतच राहिले आमच्या ज्यादा तासासाठी. स्वतःच्या जेवणाची आबळ होऊन हि चोवीस तास फक्त विद्यार्थी, शाळा यांचाच विचार करणारे. आता मला परत कोन होतील असे वाटत नाही. खूप रडले मी या वर्षी, खूप छ्ड्या खाल्ल्या पण मला स्कॉलरशिप मिळाली. त्यावेळीचे माझ्या आयुष्यातील पहिले बक्षीस आणि ती रक्कम जेव्हा हातात आली तेव्हाचा आनंद अगदी अवनर्नीय. तीच गोष्ट इयत्ता ७ वी वेळी घडली. म्हणजे मला शाळेत गौरवले गेले. खूप छान वाटत होते त्यावेळी व्यक्त करता येत नव्हते पण आज या निमित्ताने त्यांचे आभार मानते.
आयुष्यातील सात वर्षाचा अनुभव मला माझ्या आयुष्यात खूप ठिकाणी कामी आला. आणि सगळ्यात जास्त आनंद जेव्हा झाला त्यांना पुरस्कार मिळाला त्यावेळी. कारण हे खूप भूषणाव्ह होत आमच्यासाठी. कारण आम्ही त्यांच्या या प्रवासात छोटासा का होईना सहप्रवासी म्हणून जगलो.
गुरुजी जिथे जातात तिथे शिक्षणाची गंगा वाहतेच, पण संस्कार आणि शिस्तीचा पगडा कायम राहतो. आज आमच्या प्रत्यक्ष भेटीगाठी कमी होत असल्यातरी त्यांचे माझ्या मनात स्थान हे ध्रुवताऱ्या सारखे आहे.
आज मी ज्या व्यवसायात काम करते त्यामध्ये मला या वर्षी महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड २०२३ आणि राज्यस्तरीय नारी शक्ती अवॉर्ड मिळाले आहे. पण या मागची प्रेरणा आणि मुहूर्तमेढ तर गुरुजींनी माझ्या बालवयातच घातली आणि मला तु मुलगी म्हणून मागे पडता कामा नये तर मुलां प्रमाणे कर्तृत्ववान झाले पाहिजे हि शिकवण प्रेरणा स्रोत ठरली. आज हा सोन्याचा दिवस पाहिला या शिकवणी मुळेच. गुरुजींचे कितीही आभार मानले तरी कमीच.
' तुझ्या अस्तित्वाचा परीघ छोटासा का असेना पण स्व कर्तृत्वाचा असावा ' अशी शिकवण देणाऱ्या माझ्या गुरूंना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
मी सदैव तुमची ऋणी राहीन .
तुमची लाडकी विद्यार्थिनी,
.
कु.शुभांगी जयसिंग पाटील
Comments
Post a Comment