सखा
*सखा*
आमचे मित्र म्हणा अथवा सखा म्हणा पण जीवनभर मैत्री जपणारा एक सच्छिल मित्र
या मित्राबद्दल काय लिहावे आम्ही दोघांनी एकाच दिवशी नोकरीस सुरुवात केली . सुरुवातच अशा प्रकारे केली की आयुष्यभर आपल्या समोरील चिमुकल्या साठी सारे जीवन अर्पण करायचे आणि ते साध्य झालेही आणि आमच्या मैत्रीबद्दल म्हणाल तर
चन्दनं शीतलं लोके
चंदनादपि चंद्रमा: ।
चन्द्रचन्दनयोर्मध्ये
शीतला साधुसंगत: ।।
हिन्दी अर्थ :-
यहाँ बताया गया हे की चन्दन जो हे वह शीतल होता हे वह ओरो को भी शीतलता प्रदान करता हे। वैसे ही चन्द्रमा तो चन्दन से भी शीतल होता हे , आगे कहते हे की चन्दन और चंद्र की बिच में सच्ची मित्रता हे जो सतसंगति हे वह इन दोनों से अधिक शीतलता प्रदान कराती हे।एक सच्चा मित्र ही अपने मित्र के दुखो को समाज कर उसे शीतलता रूप सहायता करता हे। या प्रकारे आमची मैत्री आहे. ध्येय एक विचार एक त्यामुळे आमची वैचारिक पातळी जुळली
म्हणूनच अध्यापन अध्यापन हाच परमार्थ मानणारे संभाजीराव प्रत्येक भूमिकेत उठावदार राहिले . जसे की
न कश्चित् कस्यचिन्मित्रं,
न कश्चित् कस्यचित् रिपु:।
अर्थतस्तु निबध्यन्ते,
मित्राणि रिपवस्तथा॥
हिन्दी अर्थ :-
यहाँ पर व्यावहारिक मित्रता की बात कही गई हे, कहते हे की जन्मसे कोई किसीका भी शत्रु या फिर कोई किसीका मित्र नहीं होता हे , किसीने किसी प्रयोजन से या कार्य वश मित्र या शत्रु बनाते हे। या अपने अच्छे या बुरे व्यवहार से मित्र या शत्रु बनाते हे। त्यांच्या या चांगल्या गुणामुळेच त्यांचा मित्रसंचय वाढत गेला. समोरच्या विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच राष्ट्रपती पुरस्कारासहित सर्वच पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले.
आमच्या मैत्रीबद्दल सांगायचे झाले तर जर दोन व्यक्ती समान ध्येयाने एकत्र आल्या तर त्याचा फारच चांगला परिणाम दिसून येतो पण त्या साठी एकमेकाच्या विचारधारा जुळल्या पाहिजेत जसे की
मृगा मृगैः संगमुपव्रजन्ति
गावश्च गोभिस्तुरगास्तुरंगैः।
मूर्खाश्च मूर्खैः सुधयः सुधीभिः
समानशीलव्यसनेषु सख्यं॥
हिन्दी अर्थ :-
यहाँ पर बताया हे की कोई मित्रता ऐसे ही नहीं हो जाती मनुष्य हो या पशु हो या कोई भी जिव हो उनकी मित्रता उनके सामान गुणों या गुणधर्मो वालो से होप्ती हे। जैसे कोई मृग हे तो उसकी ,मित्रता मृग के साथ होती हे गाय की गाय के साथ , अश्व की अश्व के साथ , कोई मुर्ख हे तो उसकी मित्रता मुर्ख के साथ होती हे वैसे ही बुद्धिशाली लोगो की मित्रता बुद्धिशाली लोगो के साथ होती हे। इस तरह मित्रता सामान गुण, आचरण, आदतों वालो के साथ होती हे।
मित्र असा असावा की त्याने आपल्या ह्रदयात स्थान मिळवले पाहिजे. कोणत्याही परिस्थितित मित्राबद्दल आदराची भावना असायला हवी. ती माझ्या या मित्राकडे होती आणि आहे. त्यांनी ती आजपर्यंत जपलीही आहे. त्यासाठी संस्कृत मध्ये एक सुभाषित दिले आहे ते असे
परोक्षे कार्यहंतारं
प्रत्यक्षे प्रियवादिनं ।
वर्जयेत्तादृशं मित्रं
विषकुंभं पयोमुखम् ॥
हिन्दी अर्थ :-
यहाँ पर बहोत ही उपयोगी उदहारण के साथ मित्र को पहचानने के लिए सुभाषित दिया हे , कहते हे की जो मित्र आपने सामने प्रिय बोले और आपके जाने के बाद किसी और के सामने आपकी निंदा करे ऐसे मित्र का त्याग करने में ही बुद्धिमानी हे। क्योकि ऐसे मित्र विष के उस घड़े के सामान हे जहां ऊपर तो दूध दिखता हे पर जिसके अंदर विष भरा हुआ हे।
अशा प्रकारे गेली साडेसदतीस वर्ष विद्यार्थ्या साठी ही धडधडणारी तोफ आता ३१ मे रो जी थंडावणार आहे.
कारण आज पर्यंत शाळा आणि विद्यार्थी हेच माझे विश्व समजणारा माझा मित्र या सर्व बाबीपासून थोडा दूर जाणार आहे याचे दुःख वाटते.
मला वाटत नाही की घरात बसून त्यांना शांती मिळेल. ते भावी काळात ही काम करत राहणार यात तिळ्मात्र शंका नाही
त्यांचे असंख्य गुणवंत व शीलवंत शिष्य आहेत त्यांच्या मदतीने त्यांना एक वेगळा अध्याय सुरु करावा हीच माझी मैत्रीच्या नात्याने अपेक्षा आहे
लिहिण्यासारखे बरेच आहे त्याला मर्यादा नाही तरीही माझ्या मित्राला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मी येथेच थांबतो
* *शब्दांकन*
*श्री शशिकुमार गणपती पाटील*
मुख्याध्यापक कन्या विद्यामंदिर कसबा वाळवे ता राधानगरी
Comments
Post a Comment