माझे प्रेरक..माझे गुरूजी

 _______________


    माझे प्रेरक-माझे गुरू


       आदरणीय गुरुजी,

  

       लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनाचे!

बोलता बोलता गुंफावे ते शब्द ओठातले!

रडता रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले!

हसता हसता आठवावे ते गुरूजी शाळेतले!


        गुरूजी, तुम्ही आम्हाला सर्वोत्कृष्ट व्यक्ती बनवलात.म्हणून आभार.आजही मी माझ्या गुरूवर्यांना आणि विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना खूप मिस करत आहे.मी तीन वर्षे जरी तुमच्याकडे शिकले असले , तरीसुद्धा तुमच्याबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे.फक्त सातवीपर्यंत नाही,तर जीवनभर तुम्ही आमचे आदर्श आहात.तुम्ही जी शिकवण दिली,ती आजही आम्ही आमच्या मुलांना देत आहोत.आमच्या मुलांना सुद्धा तुम्हीच शिक्षक म्हणून हवे होता.पण असो....


        गुरूजी, तुम्ही आम्हाला दिलेले प्रेम व ज्ञान शब्दांत व्यक्त करता येत येत नाही. आणि ते सांगून संपणारही नाही.आईवडील   हे आपले पहिले गुरू असतात;पण तुम्हीच माझे पहिले गुरू आहात.मी कमी वेळ घरी आणि जास्त वेळ तुमच्या सहवासात होते.आमच्या आयुष्यात तुमच्यासारखे गुरू आले आणि आमचे आयुष्यच बदलून गेले.आम्ही तुमचे विद्यार्थी असल्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे.

         आयुष्यात आम्ही कितीही शिकलो आणि पैसा,नाव कमावले, तरीही आईवडील आणि गुरूंच्या आशीर्वादाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे.आमच्या गुरूंनी आम्हाला कितीही शिक्षा केली, तरीही आमचे गुरूंवरचे प्रेम तसूभरही कमी होत नव्हते.आजही तसेच आहे आणि भविष्यात सुद्धा! माझ्या गुरूकडे ज्ञानाचा खजिना आहे,पण आम्ही आमच्या परीने तो थोडा फार लुटण्याचा प्रयत्न केला.

 

     आमचे गुरूवर्य सर्वश्रेष्ठ गुरूजी आहेत.आमचा वर्ग सोडून इतर वर्गांतील मुले गुरूजींनी खूप घाबरायची; पण आमचं तसं नव्हतं.आम्ही शिक्षा पण आनंदाने स्वीकारत असे.त्यामुळे आमच्या आयुष्याचे कल्याण झाले.प्रिय गुरूजी, तुमच्यामुळे आम्ही सर्व खेळांचा आस्वाद घेतला.तुमच्या आग्रहामुळे आम्ही सायकल शिकलो,याचा आम्हाला अभिमान वाटतो.


     गुरूजी, तुम्हाला खूप पुरस्कार मिळाले.त्यांतील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार....! हा पुरस्कार तुम्हाला मिळाला,याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना...!


       अर्चना वागरे, गृहिणी

       (माजी विद्यार्थिनी)

Comments

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

श्रीकृष्ण जन्माष्टमी