Posts

Showing posts from September, 2023

रश्मीज् स्माईल ट्रस्टचे योगदान

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ *... रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून सरकारी शाळांना दहा लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप* *___रश्मीज् स्माईल ट्रस्टचे योगदान  *आपल्या राज्यातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या पवित्र नगरीत राधानगरी, करवीर,कागल, भुदरगड तालुक्यातील अनेक शाळांना रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून स्मार्टबोर्ड, कम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, फुटबॉल, रिंगा, स्किपिंग रोप्स, बॅडमिंटन रॅकेट, स्कूल बॅग्ज, वह्या, प्रयोगशाळा साहित्य, सॅनिटरी पॅड्, कलरबॉक्स असे विविध प्रकारचे पंचवीस लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य गेल्या तीन-चार वर्षांत मिळाले आहे.याकामी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ विकास पोतदार, सेक्रेटरी डॉ भावना कुचेरिया, प्रोजेक्ट ॲड्व्हायझर, डॉ सुहास कुचेरिया, प्रोजेक्ट इन्चार्ज मा.सोहिल शाह या आणि इतर मान्यवर मंडळींनी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद*         *२५ सप्टेंबर २०२३रोजी राधानगरी तालुक्यातील अठरा शाळांना आणि करवीर व कागल शाळेतील प्रत्येकी एका शाळेला रश्मीज् स्माईल ट्रस्ट, मुंबई यांच्या मार्फत सुमारे...

गणेश चतुर्थी आणि उकडीचे मोदक

 ..... उकडीचे मोदक.....         गौरी गणपती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य असा सण आहे.तिबेटमध्ये जन्मलेल्या शिवशंकराची पार्वतीच्या जीवनात एण्ट्री झाली आणि पार्वती-गणेशाच्या जीवनाला कलाटणी मिळाली. प्राचीन भारतातील पार्वती आणि शंकर यांचा पहिला लोकप्रिय आणि लोकमान्य आंतरजातीय विवाह होय. शिवशंकर, गणेश हे अवैदिक संस्कृतीचे होते.म्हणूनच ते अवैदिक(बहुजन) समाजात आजही लोकप्रिय आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवशंकर हेच श्रद्धास्थान होते. म्हणूनच लढाईच्या वेळी, विजयाच्या वेळी किंवा आनंदाच्या वेळी हरहर महादेव ही घोषणा दिली जात असे.          शिवशंकराने खूप मोठा संघर्ष करून भारतातील विविध समाज घटकांना सामावून घेतले आणि मूळ भारतीय संस्कृतीचा वारसा पुढे चालू ठेवला.म्हणूनच भारतीय संस्कृतीत गौरी गणपती या सणाला विशेष महत्त्व आहे.        गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीला उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो.पार्वतीपुत्र गणपतीला मोदक खूप आवडत असत.गणेशाचा जन्म हा पुराण काळात झाला.गणेश हा एका गणाचा पती (राजा) होता.म्हणूनच त्याला गणपती...

श्रीकृष्ण जन्माष्टमी

 *____________________🖋️*                             श्रीकृष्ण जन्माष्टमी                    महान तत्त्वज्ञ, बहुजन समाजाचा प्रतिनिधी, आपल्या कर्तृत्वाने ज्यांना तमाम भारतीयांनी दैवत्व बहाल करून आपल्या हृदयात आणि देव्हाऱ्यात स्थान दिले, त्या श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता झाला.श्रीकृष्णाचे आयुष्य दोन युगांच्या जोडणीत गेले.साधारणत:एक युग म्हणजे ४ लाख ३२हजार वर्षे मानले जाते.कलियुग संपायला अजून ४ लाख २७ हजार वर्षे बाकी आहेत. श्रीकृष्णाचा जन्म झाला द्वापारयुगात आणि मृत्यू झाला तो कलियुगात. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि शंख वाजवून महाभारत युदृधाची (कौरव पांडव युद्ध)सुरूवात केली.तेथूनच कलियुगाची सुरूवात झाली.म्हणूनच श्रीकृष्णाला युगप्रवर्तक म्हटले जाते.       श्रीकृष्णाचा मामा कंस याला कोणीतरी ज्योतिष्याने सांगितले की तुझ्या बहिणीच्या आठव्या पुत्रापासून तुझा वध होईल.आपला मृत्यू टाळण्यासाठी कंसाने श्रीकृष्णाच...

कॅन्सरमुक्त भारत

 __________________🖋️__       *कॅन्सरमुक्त भारत*    *भारत हा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि कॅन्सर यांसारखे आजार असलेला देश अशी ओळख निर्माण होऊ नये म्हणून आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.अलीकडे भारतात मोठ्या प्रमाणात कर्करोग (कॅन्सर)वाढत आहे . कॅन्सर हा आजार शंभर टक्के बरा होण्याची सुविधा सध्या तरी या विश्वात अस्तित्वात नाही . म्हणून रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून दक्षता घेणे आवश्यक आहे.*       *कॅन्सर हा आजार होऊच नये म्हणून लस निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत.प्लेग,पोलिओ सारखे रोग प्रतिबंधात्मक लसीकरणाने गेले असले ,तरी कॅन्सरबाबत असा ठाम विश्वास अजून तरी देता येत नाही.त्यामुळे लसीकरणावर अवलंबून राहण्यापेक्षा अन्य उपाययोजनांकडे वळले पाहिजे. कोरोनाच्या बाबतीत सर्वांना लसीकरणाच्या अनुभव आहेच*      *अन्नभेसळ ही  समस्या इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात खूप मोठ्या प्रमाणात आढळते.अगदी तांदळामध्ये सुद्धा प्लॅस्टिक तांदूळ मिसळले जातात.बाजारातून आपण जे रिफाइंडयुक्त खाद्यतेल विकत आणतो,ते तेल अगदी स्वच्छ,...