बुद्ध बुद्धू,थेर-थेरडा
*बुद्ध-बुद्धू,थेर-थेरडा*
प्राचीन पाली भाषेतून आलेले बुद्ध आणि थेर असे अनेक शब्द मराठीसह अनेक भाषांमध्ये स्थिर झाले आहेत.खरं तर बुद्ध म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त झाले आहे असा तो आणि थेर म्हणजे कुटुंबातील वयस्क व्यक्ती, वृद्ध या अर्थाने पाली भाषेत वापरले जात.बुद्धांच्या आणि त्यानंतर सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर बुद्धाचा द्वेष करणारी मंडळी हळूहळू डोके वर काढू लागली.अर्थातच पाली भाषेचाही द्वेष करू लागली.पाली भाषेतील गौरवशाली शब्दांचे हळूहळू विकृतीकरण करण्यात वैदिक परंपरेतील लेखक(ब्राह्मण्यवादी) यशस्वी झाले. त्यातूनच थेरडा,थेरडी,बुद्धू असे शब्द समाजात रूढ केले.
अंबाबाई-महालक्ष्मी,बलिमंदिर-वामन मंदिर...
कोल्हापूरच्या अंबाबाईचेच उदाहरण घ्या ना.हळूहळू महालक्ष्मीकरण करण्याचे काम सुरूच आहे.मध्यंतरी कोल्हापूरच्या पुरोगामी चळवळीने महालक्ष्मी मंदिर असा शब्द वापरायला हरकत घेतली.अंबाबाई मंदिर असाच शब्द वापरण्यास सांगितले. त्यामुळे अंबाबाई मंदिर असेच वर्तमान पत्रात येते.महालक्ष्मी ही वैदिकांची देवी आहे आणि अंबाबाई ही अवैदिकांची आहे.
अशा अवैदिकांच्या अनेक चांगल्या गोष्टींवर वैदिकांनी कब्जा करून आपल्या असल्याचे लेखनातून वारंवार प्रकट केले आहे.केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांत आजही बळीराजाबद्दल प्रचंड आस्था आणि आदर आहे.तामिळनाडूमधील कांचीपुरम हे खरे तर बलिमंदिर आहे. तेथील स्थानिक लोक महाबलीचे मंदिर असेच मानतात.,पण वैदिकांनी येथेही कब्जा करून ज्या वामनाने कपटाने बळीराजाला ठार केले,त्या वामनाचे वामनमंदिर किंवा विष्णू मंदिर असे नामकरण केले आहे.तेथे बळीराजाच्या मानेवर वामनाने पाय दिलेले चित्र सुद्धा आहे...
संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती राधानगरी
Comments
Post a Comment