शिवप्रताप दिन
**शिवप्रतापदिन- राजियाने अफजल मारिला,कर्म केले यश आले.*
*'अफजलखान वध' ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा थरार.आदिलशाही दरबारातून पैजेचा विडा उचलून 'चढे घोडीयानिशी शिवाजीला* *जिवंत किंवा मृत आपल्यासमोर आणून हजर करतो' अशी प्रतिज्ञा करून अफजलखान विजापुरहून निघाला.शिवरायांच्या बंदोबस्तासाठी 12 हजार घोडदळ व 10 हजाराचे पायदळ उंट,घोडे, हत्ती,तोफा,तलवारी- समशेरी,भाले, ढाली, कापड-चोपड,सामान-सुमान आणि 7 लक्ष रुपयाचा खजिना तसेच तीन वर्ष पुरेल इतकी मोहीम सामग्री घेऊन* *अफजलखान स्वराज्यावर चालून आला.अफजलखान म्हणजे अत्यंत क्रूर,निर्दयी व कसलेला सेनानी होता.रस्त्यात भेटेल त्याला चिरडत,गावच्या गावं जाळीत,शेतकऱ्यांची पिकं उध्वस्त करीत,खान वाईला पोचला.महाराजांनी अत्यंत अचूक नियोजन करून* *अफजलखान प्रतापगडाच्या पायथ्याला येईल यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली.8 नोव्हेंबर 1659 रोजी खान प्रतापगडाच्या पायथ्याला कोयनेच्या काठावर असणाऱ्या पारसोंड या गावात पोचला व छावणी केली. ठरल्याप्रमाणे 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या एका माचीवर म्हणजेच जणीच्या टेंभावर छ.शिवाजी महाराज व* *अफजलखान यांची भेट झाली.सर्वार्थानं बलाढ्य अशा खानाचा शिवरायांनी कोथळा काढला.तसेच खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याचाही वध केला.अफजलखानाच्या* *वकीलासह 10 च्या 10 अंगरक्षक मारले गेले.स्वराज्याच्या व रयतेच्या मुळावर उठलेला अफजलखान असो नाहीतर कृष्णा भास्कर कुलकर्णी तो स्वराज्याचा शत्रूच.तो कोणत्याही जाती-धर्माचा असो,उभा फाडला जाईल, हा खूप मोठा संदेश शिवरायांनी प्रतापगडाच्या* *पायथ्याशी दिला.प्रतापगडच्या रणसंग्रामाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांचे चुलते मंबाजी भोसले,पिलाजी व शंकराजी मोहिते,बाजी घोरपडे हे मातब्बर मराठा सरदार अफजलखानाच्या बाजूने लढले,तर छत्रपती शिवरायांच्या 10 अंगरक्षकांपैकी सिद्धी इब्राहिम हा मुस्लिम अंगरक्षक महाराजांच्या बाजूने* *लढला.मंबाजी भोसले यात मारला गेला.झुंझारराव घाटगे,रणदुल्लाखान,अंबरखान व अफजलखानाचे 2 मुलं कैद झाली. मुसेखान,अंकुशखान हसनखान, याकूतखान व अफजलखानाचा मुलगा फाजलखान लढाईतून पळून गेले.या मोहिमेतून छत्रपती शिवाजी महाराजांना खानाच्या उध्वस्त छावणीतून 4000 हजार घोडी,1200 उंट,65 हत्ती,3 लक्षाचे जडजवाहीर,7 लक्ष सोन्याच्या मोहरा व नाणी इ. 2 हजार कापडाची ठाणे,अनेक तोफा इ. ऐवज हाती आला.आदिलशाहीचं मोठं नुकसान झालं.रयतेच्या मनात आपल्या राजाबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला. अफजलखानाच्या वधाने स्वराज्यावरील संकटतर टळलेच पण छत्रपती शिवरायांची कीर्ती भारतभर* *पसरली.आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर योग्य नियोजनाने प्रयत्नपूर्वक मात करता येते,हाच संदेश शिवचरित्रातून आपल्याला मिळतो.आपल्यापेक्षा कित्येक पटीने शक्तिशाली* *अफजलखानाचा महाराजांनी कोथळा काढला,तोच आजचा दिवस.शिवप्रतापदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.*(10 नोव्हेंबर 1659)💐
*10 नोव्हेंबर 2023*
Comments
Post a Comment