तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

 .

तुलशी विवाह - एक अनिष्ट प्रथा.


         परंपरा, संस्कृती, उत्सव, प्रथा या गोष्टी भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. यातून आनंद मिळतो, सांस्कृतिक वारसा मिळतो. हे जरी खरे असले, तरी काही प्रथांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. काही प्रथा,परंपरा इतिहासाच्या साक्षीदार म्हणून आपण जपत आलो आहोत. पण काही विकृत ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या असलेल्या परंपरा आपण जोपासत असेल ,तर मात्र आपण आपली सद्‌सद‌विवेकबुद्‌धी कुठेतरी गहाण ठेवली आहे, असेच म्हणावे लागेल, अशीच एक परंपरा आपण डोळ्यांवर प‌ट्टी बांधून हजारो वर्षापासून चालवत आलो आहोत. आणि ती परंपरा म्हणजे 'तुलसी विवाह 'होय. , या तुलसी विवाहाबाबतच आपण माहिती घेणार आहोत.


       भारताच्या सप्तसिंधु प्रदेशात बळी वंशातील पराक्रमी राजांचे राज्य होते. त्यांनी हजारो वर्षापासून आर्यांशी म्हणजे वैदिक संस्कृतीशी संघर्ष केला आणि आपली मूल भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बंळीवंशात हिरण्याक्ष, हिरण्यक, हिरण्यकशिपू प्रल्हाद, विरोचन, कपिल, बळी, बाणासूर असे एकापेक्षा एक पराक्रमी आणि शीलवान राजे होऊन गेले, हे माझ्या 'बलिप्रतिपदा...' या लेखात सविस्तर आले आहे.तो लेख तुम्ही वाचला असेलच. बळीराजाचा वंशज जलंधर आणि त्याची पत्नी तुलसी यांची कथा काय आहे ते आपण पाहणार आहोत.


         तुम्हास माहीत आहे की शंकर म्हणजे शिव (रुद्र) आणि इंद्र यांच्यांत तीव्र संघर्ष होता. कृष्णाने इंद्राला जाणारा नैवेद्य बंद केला होता .त्याच शंकराच्या क्रोधापासून जलंधर निर्माण झाला, शंकराने आपला क्रेाध समुद्रात टाकला आणि त्यापासून जलंधर निर्माण झाल्याची कथा शिवपुराणात आली असली, तरी शंकराने जलंघराला पुत्र मानले होते, एवढेच वाचकांनी लक्षात ठेवावे.


शिवपुराणातील कथा:

          सनत्कुमाराने व्यासांना सांगितलेल्या कथेनुसार जलंघर हा शंकराच्या तेजाने निर्माण झाला ,असे म्हटले आहे. जलंधराने कालनेमि नावाच्या असूराच्या 'वृंदा' या रुपवती मुलीशी मोठ्या थाटामाटाने विवाह केला होता. शुक्राचार्यांनी विष्णूने फसवून बलिला म्हणजे बळीला मारल्याचे सांगितल्यावर जलंधर रागाने लालबुंद झाला होता. त्याने युद्धाची तयारी करून देवांशी म्हणजे इंद्रादी ब्राह्मणांशी युद्‌ध पुकारले. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात साल्यावर इंद्रादी देव स्वैरभैर झाले. ते सैरावैरा पळू लागले.जलंघराने इंद्राचे राज्य ताब्यात घेतले. इंद्र आणि सर्व ब्राह्मण मंडळी विष्णूकडे गेली. त्यांनी विष्णूची खूप स्तुती केली, बळीराजाला जसे कपटाने मारले तसे जलंधरालाही कपटाने मारावे व आपले राज्य परत मिळवून दयावे, अशी सर्वांनी विष्णूला विनंती केली होती. विष्णूने त्यांची विनंती मान्य करून इंद्रासह तोही रणांगणात उतरला. जलंघराने विष्णूसह सर्वांचा पराभव केला आणि विष्णूला कैद करुन आपल्या जालंधर नगरीत आणले आणि तुरुंगात ठेवले. आज पंजाबात जालंधर जिल्हा आहे. हीच जलंधराची कर्मभूमी होय.जलंधर म्हणजे जल आडवून धरण बांधणारा होय. त्याच्या नावातच त्याचे कार्य आणि कर्तृत्व लपलेले आहे.


        छत्रपती शिवरायांना जिजामातेने रामायण, महाभारताच्या माध्यमातून प्राचीन इतिहास सांगितला होता. म्हणून ते इतिहासातील चुका टाळत.जलंधराने विष्णूला पकडून कैद करण्याऐवजी ठार मारले असते तर पुढे दुर्देवी इतिहास घडला नसता. प्रतापराव गुर्जरांनी बेहलोलखानाला पकडून असेच सोडले होते. त्याचा परिणाम काय झाला, हा इतिहास सर्वांना माहीत आहेच.मराठ्यांनी नजिबखानाला जिवंत सोडून दिले.त्याचे परिणाम पुढे पानिपतच्या युद्‌धात मराठ्यांना भोगावे लागले.असो...

                

                   फितुरीचा शाप बळीराजाला जसा होता, तसाच जलंधर राजालाही होता. अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने नैतिकतेने जलंधर आपल्या रयतेची काळजी घेत होता; पण फितुरीने त्याच्या राज्याला सुरुंग लावण्याचे काम विष्णूने जलंधराच्याच नगरात राहून चालू ठेवले होते.


      विष्णूने नारदाला निरोप देऊन जलंधर राजाला भेटण्यास सांगितले.कळीच्या नारदाने जलंधराच्या संपत्तीची, ऐश्वर्याची पाहणी केली.त्याची स्तुती केली. नारदाने जलंधराला यु‌द्धासाठी प्रवृत्त करून दूर पाठवले. इकडे विष्णूला रान मोकळे मिळाले. वृंदेला दिसतील असे अपशकून घडवून आणले. वृंदा पतिव्रता होती. यु‌द्धात आपल्या पतीला काही दगा फटका होऊ नये म्हणून ती धडपड करू लागली, कोणीतरी साधू संतांना भेटण्याचा सल्ला दिला. विष्णूच्या व्यूहरचनेत वृंदा अडकत गेली. एक दिवस जलंधराचे रूप घेऊन विष्णूने वृंदेच्या शयनगृहात प्रवेश करून तिचा विनयभंग केला,वीर्याधान केले.वीर्याधान हा शब्द  मी वापरत नाही पुराणात आला आहे.यावरून वृंदेकडे म्हणजेच तुलसीकडे पुराणकार कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे सुज्ञ वाचकाच्या लक्षात आले असेल.विष्णूने आपल्याशी सलगी केली ही गोष्ट वृंदेला सहन झाली नाही .तिने विष्णूला शाप देऊन  अग्नीत उडी घेऊन आत्महत्या केली.


        इकडे वृंदेच्या आत्महत्येची बातमी ऐकून जलंघराचा तोल सुटला. त्याची एकाग्रता भंग पावली.आणि तो युद्‌धात  मारला गेला. नारद जणू शंकराच्या आज्ञेने जालंधरनगरीत गेला होता आणि कहर म्हणजे पार्वतीच्या आज्ञेनुसारच विष्णूने वृंदेचे पातिव्रत्य भंग केले, असेही पुराणात लिहून ठेवले आहे. मातृतुल्य आणि पितृतुल्य असलेले शंकर-पार्वती कसे काय जलंधराला ठार मारण्यास आणि तुलसीवर बलात्कार करण्यास पुढाकार घेतील? जलंधर पार्वतीचे हरण करण्यासही (नारदाच्या सूचनेवरून) कैलासवर चालून गेला आणि तेथेच शंकराने त्याला ठार मारले .अशीही कथा रचून निष्कलंक जलंधराला बद‌नाम करण्याचे कारस्थान रचले आहे.पार्वतीच्या आज्ञेवरुनच आपण वृंदेशी सलगी केल्याचे विष्णू सांगतो, याचा हेतू एवढाच की विष्णूने जो गुन्हा केला, त्याला समाजमान्यता मिळवणे हा होय. विष्णु हा कपटी, कारस्थानी, धूर्त, जलंधराच्या वैभवाला जळणारा असा होता. यातूनच या दोन्ही घटना एकाच वेळी घडवून आणून बहुजन समाजाची खूप मोठी हानी केली आहे.


      शिवपुराणात शंखचूड आणि तुलसी यांची ही सु‌द्धा एक कथा आहे. शंखचूड हा पूर्वजन्मीचा सुदामा आणि तुलसी ही राधेची दासी अशीही कथा रंगवून सांगितली आहे. पूर्वजन्म या गोष्टी भ्रामक समजून शंखचूड आणि तुलसी याब‌द्दल अधिक विश्लेषण करत नाही. आणखी एक कथा देवी भागवतमध्ये शंखचूड आणि तुलसी यांची आहे. या कथेत तुलसीने  नारायणाची प्राप्ती व्हावी म्हणून तपस्या केली होती. आणि त्याचे फलित म्हणून पुढील जन्मात विष्णूने प्राप्त केले. विशेष म्हणजे शंखचूडही या गोष्टीचे समर्थन करतो 'तू माझ्यानंतर विष्णूची पत्नी होणार आहेस, आनंदाने संसार कर, असा कोणता पती म्हणेल का?' आपले दुष्कृत्य लपवण्यासाठी आणि  खपवण्यासाठी वेगवेगळ्या कथा रचून समर्थन करण्याचा हा खटाटोप आहे.


         आजही तुलसी विवाह आपण म्हणजे बहुजन समाज मोठ्या थाटामाटात करत आहे.याहून दुर्दैव ते कोणते?ज्या तुलसीने विष्णूशी संबंध नाकारत अग्नीत उडी घेऊन आत्महत्या केली, त्याच तुलसीचा कार्तिक द्वाद‌शीलाइकडे वृंदेच्या आत्महलेची बातमी ऐकून जलंघराचा तोल सुटला. लांची एकाग्रता भंग वावजी आणि युद्‌धात मारला गेला. नारद जणू शंकराच्या आरोने जालंधरनगरीत गेला होता आणि कर कहर म्हणजे पार्वतीच्या अरोनरुक्त विष्णून वृंदेचे पानिव्रत्य भंग केले, असेही पुराणात लिहून देवले आहे. मातृतुल्य आणि पितृतुल्य असलेले शंकर पार्वती कसे काय जलंधराला ठार मारण्यास आणि तुलसीवर बलात्कार करण्यास पुढाकार घेतील? जलंधर पार्वतीचे हरण करण्यासही (नारदाच्या सूचनेवरून) कैलासवर चालून गेला आणि तेथेच शंकटाने त्याला ठार मारले अशीही कथा रचून निष्कलंक जलंधराला बद‌नाम करण्याचे आणि पार्वतीच्या आशेवरुनच आपण वृंदेशी सलगी केल्याचे विष्णू सांगतो, सांगण्याचा हेतू एवढाच की विष्णूने जो गुन्हा केला  त्याला समाजमान्यता मिळवणे हा होय. विष्णु हा कपटी, कारस्थानी, धूर्त, जलंधराच्या वैभवावर जळणारा होता. यातूनच या दोन्ही घटना एकाच वेळी घडवून बहुजन समाजाची खूप मोठआपली अनैतिकता झाकण्यासाठी बहुजनांच्या नेत्यांची नावे त्यात गोवली आहेत, शंकर पार्वती, कृष्ण यांच्या आडून आपले पाप जणू पुण्यच असे दाखवण्याचा खटाटोप आहे हा.जलंधराने तथाकथित विष्णूचा पराभव केला होता आणि त्याला बंदी बनवले होते.पुराणातील विश्वकोश या ग्रंथात Indra and Vishnu were defeated and Vishnu was taken captive.असा उल्लेख आहे.पण पुराणकार हे मान्य न करता विष्णूच जालंधरनगरीत गुप्तपणे आला होता, असेच सांगतात. 


            पुराणात तुलसीच्या शरीराचे वर्णन करताना निर्लज्जपणाचा कळस केला आहे. जणू तिच्यावर जलंधराचा हक्क नसून विष्णूचाच हक्क असल्याचे दाखवले आहे.जलंधराने तुलसी प्राप्त व्हावी म्हणून जशी तपस्या केली होती, तशीच' तपस्या तुलसीने गत जन्मात विष्णू प्राप्त व्हावा म्हणून केली होती, असे पांघरूण घालण्यासाठी विष्णू तिची सांत्वन करतो. "तू माझ्याबरोबर चल. लक्ष्मीप्रमाणे तुझाही पत्नी म्हणून स्वीकारतो".पण तुलसीने सर्व आमिषांना ठोकर देत विष्णूची निर्भत्सनाच केली. त्याला शाप देत, आक्रोश करत अग्नीत उडी घेऊन आयुष्य संपवले; मग अशा वृंदेचे (तुलसीचे) लग्न आपण धूर्त, कपटी, कलंकित भ्रष्ट विष्णूशी लावणार आहोत का?

         

          आजही तुलसी विवाह आपण म्हणजे बहुजन समाज करत आहे, ज्या तुलसीने विष्णूशी संबंध नाकारत अग्नीत उडी घेऊन आत्महत्या केली, त्याच तुलसीचा कार्तिक द्वाद‌शीला विष्णूशी (शाळीग्राम) किंवा ज्याचा या घटनेशी  काडीमात्रही संबंध नाही,त्या कृष्णाशी विवाह लावून देऊन पिढ्यान् पिढ्या तुलसीचा, तुलसीच्या पातिव्रत्याचा अपमान करीत आहोत. लोक शिक्षित झालेत;पण विवेकशील झाले नाहीत. प्रत्येक घटनेमागील कार्यकारण‌भाव शोधल्याशिवाय तिचे अनुकरण करु नये, हे सुशिक्षितांचे काम आहे.अंधानुकरण करू नये.हीच आपली जबाबदारी आहे,हे विसरू नये.

        तुलसी विवाह ही प्रथा बंद पाडून तुलसीला आम्ही मुक्ती देत आहोत. निश्चितच तुम्हीही तुलसीच्या मुक्तीसाठी पावले उचलाल अशी आशा आहे.(आधार:आ. ह. साळुंके, समग्र लेखन)


                           संभाजी पाटील 

             राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक.                 माजी शिक्षण विस्तार अधिकारी, फोन. 9049870674

             

Comments

  1. खूप सुस्पष्टपणे आणि तळमळीने बहुजनांची दृष्टी विवेकवादी बनवण्याचा लेखनातून प्रयत्न केला आहे. खूप अभिनंदन आणि आभार, सर!

    ReplyDelete
  2. किती फेकताय?
    ज्यांना इतिहास माहीत नाही
    ते तर तुम्हाला व्यास समजतील.
    का एका उज्जवल संस्कृतीवर शिंतोडे उडवत आहात?

    तुकोबा तरी मान्य आहेत का तुम्हाला?

    ReplyDelete
    Replies
    1. अशीलोकांच्या डोक्यात राख कालवल्याने काही लोक तरी बिघडतील अशीच या लेखा मागील विचार असणार

      Delete
    2. तुकोबा यांचे विद्रोही विचार जगन्मान्य आहेत. त्यांनी आपल्या लेखणीतून वेळोवेळी बंडखोरी सिद्ध केली आहे.

      Delete
  3. संपत गायकवाड, माजी साहाय्यक शिक्षण संचालक यांची प्रतिक्रिया

    सर,तुमचा हा लेख तुमची प्रतिभा,तुमचे प्रचंड वाचन,मनन व चिंतन यांची साक्ष देते.तुमचे लेखन आ ह साळुंखे यांच्या लेखनाच्या तोडीचे किंबहुना त्याहीपेक्षा सरस आहे.तुमच्याकडून ऐतिहासिक लेखनातील वास्तवतेस व वैचारिक प्रगल्भतेस साष्टांग नमस्कार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. आ.ह. साळुंखे यांच्या विषयी आदर आहे, परंतु ज्या पद्धतीने ते गरळ ओकतात ते कदापिही स्वीकारले जाऊ शकत नाही.
    प्रस्तुत लेखात लेखकाने ज्या पद्धतीने आख्यानाचा विपर्यास केलेला आहे तो निश्चितच एखाद्या निर्बुद्ध व्यक्तीचे लक्षण आहे. जर तुमच्या लेखातील एखादी ही बाब सत्य असेल, तर कोणत्या पुराणात तसे उल्लेख आहेत त्याचे संदर्भ तुम्ही जशाला तसेच कोट करायला हवेत. विनाकारण हिंदू धर्म परंपरेला बदनाम करण्याचे उद्योग सोडून द्या.

    ReplyDelete
    Replies
    1. शिव पुराण वाचा ,देवी भागवत वाचा.सत्य समजेल

      Delete
  5. इकडे आदर आहे म्हणायचं आणि इकडे टीका करायची.पुराणकारांनी काय दिवे लावले आहेत,तेच आ ह साळुंखे मांडत आहेत.आणि मीही तेच मांडले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उगीच मनुस्मृती जाळली नाही.अठरा पुराणे वाचा आणि त्यांवर भाष्य करा.मनुस्मृती वाचा आणि त्यावर भाष्य करा.म्हणजे कळेल.उगाच वरवर टीका करू नका.आ ह साळुंखे यांनी लिहिलेली पुस्तकांची मालिका मनापासून वाचा.होईल बदल तुमच्यातही.

    ReplyDelete
  6. कोणीतरी सत्य लिहिले की काहींच्या पोटात दुखते.दुसरे काय

    ReplyDelete
  7. परंपरेला छेद देणारा आपला अभ्यासपूर्ण आणि उद्बोधक लेख वाचला. आणि गायकवाड साहेबांच्या सह इतरांच्या ही प्रतिक्रिया वाचल्या. परंपरेला चिकटून राहिलेल्या समाजाला त्या इतक्या लवकर पचनी पडतील असे नाही. आपणाकडे ही असे स्फोटक लिहिण्याची धमक नाही आणि इतरांनी लिहिलेलं मान्य करण्याचं धाडस नाही. कुणीतरी हे असं लेखन करायलाच पाहिजे त्यामुळे उशिरा का होईना समाज जागृत होईल. ज्या वाचकांना हे लेखन पचत नाही त्यांना हे लेखन प्रक्षोभक वाटतं आणि अशीच मंडळी समाजाला घातक असतात.
    आपले वाचन, मनन आणि लेखन कौतुकास्पद आहे.
    शुभेच्छा.
    धन्यवाद.
    दत्ता परीट, ग्रामीण कथाकार

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

मुले,शाळा आणि गृहपाठ