Posts

रानभाज्या

 रानभाज्या भरपूर प्रमाणात खायला हव्यात.जो निसर्गात मिळणाऱ्या शुद्ध भाज्या खातो,तो कधीच आजारी पडत नाही.पावसाळ्यात भरपूर प्रमाणात रानभाज्या उपलब्ध असतात.या रानभाज्यांचा आस्वाद सर्वांनी घेतला पाहिजे.माझे आईबाबा नेहमी म्हणायचे,"फिरल तो चरल". रानावनात जो फिरत राहतो, त्याला निसर्ग उपाशी ठेवत नाही. बाजारात मिळणाऱ्या भाज्या आणि निसर्गात मिळणाऱ्या शुद्ध भाज्या यांत फरक आहे.बाजारातील भाज्यांवर वेगवेगळी कीडनाशके फवारलेली असतात.या कीडनाशकांचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो.अशा भाज्या विशिष्ट प्रक्रिया करून खाणे आवश्यक असते;पण निसर्गात मिळणाऱ्या भाज्या म्हणजे बावनकशी सोनं होय.शुद्ध चोवीस कॅरेट.रानभाज्या भरपूर खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.शरीरास आवश्यक असणारी खनिजे रानभाज्यांमधून मिळतात.हाडे मजबूत बनतात.म्हणून रानभाज्या भरपूर खा आणि निरोगी राहा.

पर्यावरण दिन

 ५ जून हा पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो.खरं तर केवळ एक दिवस पर्यावरण दिन साजरा करून काहीच उपयोग होत नाही.त्यामुळे पर्यावरणाचे पर्यायाने संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे.पर्यावरणाबाबत जागृती खूप होऊनही म्हणावी तशी अंमलबजावणी झालेली नाही.     ध्वनिप्रदूषण,हवा प्रदूषण, जमीन प्रदूषण, जलप्रदूषण आणि अन्नप्रदूषण सुद्धा अलीकडे खूप वाढत चालले आहे.या सर्व बाबी पर्यावरणाशी निगडित आहेत.पण लक्षात कोण घेतो...? आपण फक्त सल्ले देण्यात पुढाकार घेतो.माळावर बिया फेकायला सांगतो.झाडे लावायला सांगतो,वृक्षभेट द्यायला सांगतो,'प्लॅस्टिक  टाळा 'असा फुकटचा सल्ला देतो;पण अंमलबजावणी मात्र काहीच करत नाही.     पर्यावरणाच्या दिवसेंदिवस होत असलेल्या ऱ्हासामुळे संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली आहे.जैवविविधतेची शृंखला  बिघडली आहे.आपण पुढच्या पिढीच्या उदरनिर्वाहासाठी बरेच काही मिळवून ठेवण्यासाठी धडपडत असतो.उद्योग निर्मिती करतो.यांतूनच पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो.आज प्रत्येक शहराबाहेर आणि खेड्याबाहेर सुद्धा प्लॅस्टिक कचऱ...

बाणेदार छत्रपती: संभाजी महाराज

 बाणेदार छत्रपती: संभाजी महाराज       महाराष्ट्र्राचा देदीप्यमान ऐतिहासिक परंपरेत स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे आणि त्यागाचे पर्व अविस्मरणीय असेच आहे.सुमारे सव्वातीनशे वर्षे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम मूठभर इतिहासकारआणि बखरकार यांच्या लेखणीतून झाले;परंतु एकविसाव्या शतकात मात्र अमोल कोल्हे यांच्या 'स्वराज्यरक्षक संभाजी 'या मालिकेमुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा शंभूराजे यांचे शुद्ध चरित्र कळले.अर्थात या मालिकेचा जन्म होण्यापूर्वी वा सी बेंद्रे, सेतू माधवराव पगडी, शेजवलकर, इंद्रजित देशमुख, जयसिंगराव पवार, श्रीमंत कोकाटे अशा विविध इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडाचा, राज्यकारभाराच्या पद्धतीचा, चारित्र्याचा आणि पराक्रमाचा चिकित्सक अभ्यास करून खरा इतिहास समाजासमोर मांडला.      १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या पोटी जन्मलेल्या शंभूराजांच्या वयाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशी सईबाई यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ते मातृसुखाला ...

1 ते 1000 पर्यंतच्या रोमनसंख्या / 1 to 1000 Roman Numerals

Image
सदर‌ माहितीच्या आधारे तुम्ही १ते १००० पर्यंतच्या स़ंख्या रोमन संख्या चिन्हात लिहू शकता 

महत्त्वाचे शुद्ध शब्द

आशीर्वाद, आशिष, पारंपरिक, उज्ज्वल, शुद्धिपत्र सीताराम, दीपिका, दीपावली, दीपक ,दिवाळी , नैर्ऋत्य, हृषिकेश (ऋषिकेश -चुकीचा), सीमा, मीना,  लीला ,सूर्य, सूर्यकांत,मंदिर,परीक्षक,वसतिगृह,

मराठी नावे आणि अर्थ

बर्‍याच वेळा मुलांना ठेवलेल्या नावांचा अर्थ पालकांना माहिती नसतो.   उदा.      शेखर= मुकुट       अंजली = ओंजळ    साहिल=किनारा अरूण=सूर्य अद्वी=अद्वितीय, शारदा=सरस्वती  
एका वर्तुळावर सात नैकरेषीय बिंदू आहेत.  ते सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी   किती रेषाखंड काढावे लागतील?  उत्तर : 21 सूत्र : 7*6=42         42/2=21 स्पष्टीकरण :सात बिंदू आहेत, म्हणून 7 ला                  6 ने गुणले.आणि येणाऱ्या गुणाकाराला                   2 ने भागले, उत्तर आले 21