. तुलशी विवाह - एक अनिष्ट प्रथा. परंपरा, संस्कृती, उत्सव, प्रथा या गोष्टी भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. यातून आनंद मिळतो, सांस्कृतिक वारसा मिळतो. हे जरी खरे असले, तरी काही प्रथांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. काही प्रथा,परंपरा इतिहासाच्या साक्षीदार म्हणून आपण जपत आलो आहोत. पण काही विकृत ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या असलेल्या परंपरा आपण जोपासत असेल ,तर मात्र आपण आपली सद्सदविवेकबुद्धी कुठेतरी गहाण ठेवली आहे, असेच म्हणावे लागेल, अशीच एक परंपरा आपण डोळ्यांवर पट्टी बांधून हजारो वर्षापासून चालवत आलो आहोत. आणि ती परंपरा म्हणजे 'तुलसी विवाह 'होय. , या तुलसी विवाहाबाबतच आपण माहिती घेणार आहोत. भारताच्या सप्तसिंधु प्रदेशात बळी वंशातील पराक्रमी राजांचे राज्य होते. त्यांनी हजारो वर्षापासून आर्यांशी म्हणजे वैदिक संस्कृतीशी संघर्ष केला आणि आपली मूल भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बंळीवंशात हिरण्याक्ष, हिरण्यक, हिरण्यकशिपू प्रल्हाद, विरोचन, कपिल, बळी, बाणासूर असे एकापेक्षा एक पराक्रमी आणि शीलवान रा...
संविधान दिन 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11महिने 18 दिवस लागले.9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते.कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या.यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे सचिव होते.डॉ.बी.एन.राव हे कायदेविषयक सल्लागार होते. याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरू,नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल,सरोजिनी नायडू अशा अनेक नामवंत बॅरिस्टर दर्जाच्या व्यक्ती संविधान सभेत सदस्य होत्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सर्वांच्या विचारविनिमयातून संविधान तयार झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाला कायदेविषयक कलमात बंदिस्त केले.संविधान सभेच्या अनेक बैठका झाल्या.दुरुस्त्यांसह 26 न...
दुबई दर्शन.... एक अविस्मरणीय प्रवास... आमच्या लहानपणी कधी कधी मोठी माणसं मुंबईला जात. मग ही मुंबई रिटर्न माणसं गल्ली बोळातून 'मी जिवाची मुंबई कशी केली ?' याच गप्पा मारत फिरत असत. त्यामुळे त्यावेळी एक म्हण रूढ झाली होती, "जिवाची मुंबई एकदा तरी करावी". आज परिस्थिती बदलली आहे. जग खूप जवळ आले आहे. काळाच्या ओघात म्हणी पण बदलल्या आहेत. 'जन्माला यावे आणि एकदा तरी दुबई पाहायला जावे' ही म्हण समाजात अधिक रुजत आहे. काय आहे त्या दुबईत ? संपूर्ण जगातील पर्यटक ज्या ठिकाणी भेट देतात, ते ठिकाण म्हणजे दुबई, मलाही दुबईला जाण्याचा योग आला तो मित्रमंडळींच्या आग्रहाखातर. कोल्हापुरच्या 'Heaven Travellers' यांनी 16 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत 'दुबई- अबुधाबी' सहल आयोजित केली होती. यात आम्ही सामील झालो. माफक दर आणि नियोजनबद्ध कार्यवाही, यासाठी Heaven Travellers प्रसिद्ध आहे. रज बुगडे, वर्षा बुगडे, संकेत पानारी आणि स्नेहल या सर्व मंडळींनी खूप मोठे सहकार्य केल्यामुळेच आमची दुबईवारी यशस्वी झा...
Comments
Post a Comment