ऐतिहासिक स्थळे आणि सुशोभीकरण
महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना हसन मुश्रीफ यांनी ऐतिहासिक स्थळांची दुरूस्ती, सुशोभीकरण करण्यासाठी नुकताच भरघोस निधी मंजूर केला आहे.त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.ऐतिहासिक स्थळांची डागडुजी झालीच पाहिजे.आपला तो ऐतिहासिक वारसा आहे.तो जपलाच पाहिजे. पण गड किल्ले किंवा ऐतिहासिक कोणत्याही वास्तू यांची डागडुजी करण्यासाठी इतिहास संशोधक यांचा किमान एकदा तरी सल्ला घेणे आवश्यक आहे. ना.हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी निधी मंजूर केला आहे,ही बाब अभिमानास्पद आहेच.पण विशाळगडावरील बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीस्थळी दीड कोटीच्या वर निधी मंजूर केला आहे,याचे आश्चर्य वाटले. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाला जाताना त्यांना सहाशे बांधवांनी संरक्षण दिले होते. वाटेत घोडखिंडीत सिद्दी मसूदचे सैन्य महाराजांच्या अगदी जवळ आल्यावर बांदलांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले.रायाजी बांदल या तरुण सरदारांच्या नेतृत्वाखाली तीनशे मावळ्यांची एक तुकडी घोडखिंडीत थांबली आणि महाराजांच्या बरोबर त...