Posts

Showing posts from November, 2023

हेमंत करकरे-खरा देशभक्त

 ....... *हेमंत करकरे - खरा देशभक्त*                २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून हाहाकार उडवून दिला होता. ती घटना आजही महाराष्ट्रीयन विसरलेले नाहीत. तत्कालीन एटीएस प्रमुख (दहशतवाद विरोधी पथक प्रमुख) हेमंत करकरे यांच्याकडे सर्व सूत्रे होती. हेमंत करकरे स्वतः मैदानात उतरून लढले होते. यांतच त्यांचे बलिदान गेले होते.          पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्‌यांनी मुंबई समुद्रकिनारपट्‌टीवर आल्यावर तेथील नौका ताब्यात घेतली, नावाड्याने गेट वे ऑफ इंडिया' जवळ आणून सोडल्यावर त्याला गोळी बालून मारले आणि दहशतवादी ताज हॉटेलात शिरले. काही दहशतवादी 'हॉटेल ओबेरॉय' च्या दिशेने गेले आणि अंधाधुंद गोळीबार सुरु झाला; पण त्याच वेळी मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट चालू होता. करकरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामा हॉस्पिटल कडे जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. आदेशाचे तंतोतंत पालन करत करकरे, विजय साळसकर, कामटे इत्यादी मंडळी कामा हॉस्पिटलकडे निघाली. कामा हॉस्पिटलच्या परिसर...

संविधान दिन..

                        संविधान दिन             26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11महिने 18 दिवस लागले.9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते.कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या.यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे सचिव होते.डॉ.बी.एन.राव हे कायदेविषयक सल्लागार होते. याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरू,नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल,सरोजिनी नायडू अशा अनेक नामवंत बॅरिस्टर दर्जाच्या व्यक्ती संविधान सभेत सदस्य होत्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सर्वांच्या विचारविनिमयातून संविधान तयार झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांनी संविधानाला कायदेविषयक कलमात बंदिस्त केले.संविधान सभेच्या अनेक बैठका झाल्या.दुरुस्त्यांसह 26 न...

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

 . तुलशी विवाह - एक अनिष्ट प्रथा.          परंपरा, संस्कृती, उत्सव, प्रथा या गोष्टी भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. यातून आनंद मिळतो, सांस्कृतिक वारसा मिळतो. हे जरी खरे असले, तरी काही प्रथांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. काही प्रथा,परंपरा इतिहासाच्या साक्षीदार म्हणून आपण जपत आलो आहोत. पण काही विकृत ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार असलेल्या असलेल्या परंपरा आपण जोपासत असेल ,तर मात्र आपण आपली सद्‌सद‌विवेकबुद्‌धी कुठेतरी गहाण ठेवली आहे, असेच म्हणावे लागेल, अशीच एक परंपरा आपण डोळ्यांवर प‌ट्टी बांधून हजारो वर्षापासून चालवत आलो आहोत. आणि ती परंपरा म्हणजे 'तुलसी विवाह 'होय. , या तुलसी विवाहाबाबतच आपण माहिती घेणार आहोत.        भारताच्या सप्तसिंधु प्रदेशात बळी वंशातील पराक्रमी राजांचे राज्य होते. त्यांनी हजारो वर्षापासून आर्यांशी म्हणजे वैदिक संस्कृतीशी संघर्ष केला आणि आपली मूल भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बंळीवंशात हिरण्याक्ष, हिरण्यक, हिरण्यकशिपू प्रल्हाद, विरोचन, कपिल, बळी, बाणासूर असे एकापेक्षा एक पराक्रमी आणि शीलवान रा...

इडा पिडा टळू दे,बळीचे राज्य पुन्हा येऊ दे

 ........................... इडा पिडा टळू दे..बळीचे राज्य पुन्हा येऊ दे....          आमच्या लहानपणीचा म्हणजे मी साधरणतः नऊ दहा वर्षांचा असेन, त्यावेळचा प्रसंग मला आजही आठवतोय. दिवाळीत 'बलिप्रतिपदा' हा दिवस । आम्ही सकाळी लवकर लवकर उठून अंघोळ करून दारासमोरील अंगणात रांगोळी काढलेल्या ठिकाणी कडू कारिट डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचो. आमचे बाबा सर्वांत अगोदर कारिट फोडायचे. त्यानंतर मग आम्हीही डाव्या पायाच्या अंगठ्याने सर्वशक्ती पणाला लावून कारिट फोडायची. माझ्या बालबुद्‌धीला या प्रथेबाबत अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. मी करिट फोडून झाल्यावर बाबांना विचारले "बाबा, बलिप्रतिपदे- दिवशी कारिट का फोडतात ? आणि ते कारिट डाव्या पायाच्या अंगठ्यानेच का फोडायचे?" माझ्या या प्रश्नाला बाबांनी उत्तर दिले. "आरं, याच दिवशी विष्णूने वामनाच्या रुपात येऊन डाव्या पायाच्या अंगठ्याने बळीराजाला ठार मारले: विष्णूच्या पराक्रमाची आठवण म्हणून आपण ही प्रथा करत आहोत." बाबांच्या या उत्तराने माझे समाधान झाले नाही. म्हणून मी बाबांना आणखी प्रश्न विचारले, " बाबा, बळीराजा खूप वाईट होता का? कडू ...

शिवप्रताप दिन

 **शिवप्रतापदिन- राजियाने अफजल मारिला,कर्म केले यश आले.* *'अफजलखान वध' ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा थरार.आदिलशाही दरबारातून पैजेचा विडा उचलून 'चढे घोडीयानिशी शिवाजीला* *जिवंत किंवा मृत आपल्यासमोर आणून हजर करतो' अशी प्रतिज्ञा करून अफजलखान विजापुरहून निघाला.शिवरायांच्या बंदोबस्तासाठी 12 हजार घोडदळ व 10  हजाराचे पायदळ उंट,घोडे, हत्ती,तोफा,तलवारी- समशेरी,भाले, ढाली, कापड-चोपड,सामान-सुमान आणि 7 लक्ष रुपयाचा खजिना तसेच तीन वर्ष पुरेल इतकी मोहीम सामग्री घेऊन* *अफजलखान स्वराज्यावर चालून आला.अफजलखान म्हणजे अत्यंत क्रूर,निर्दयी व कसलेला सेनानी होता.रस्त्यात भेटेल त्याला चिरडत,गावच्या गावं जाळीत,शेतकऱ्यांची पिकं उध्वस्त करीत,खान वाईला पोचला.महाराजांनी अत्यंत अचूक नियोजन करून* *अफजलखान प्रतापगडाच्या पायथ्याला येईल यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली.8 नोव्हेंबर 1659 रोजी खान प्रतापगडाच्या पायथ्याला कोयनेच्या काठावर असणाऱ्या पारसोंड या गावात पोचला व छावणी केली. ठरल्याप्रमाणे 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या एका माचीवर म्हणजेच जणीच्या टेंभावर छ.शिवाजी महाराज व* *अफजलखा...

महाबळेश्वर, वयगाव आणि भिलार वारी

 महाबळेश्वर, वयगाव आणि भिलार वारी      महाराष्ट्रातील एक नामवंत थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर परिसरात पाच सहा दिवस मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटला. निसर्गरम्य परिसर, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाणी या सर्व गोष्टींचा आनंद अगदी भरभरून घेता आला. वयगाव...      सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील अगदी कृष्णेच्या उगमस्थानी वयगाव हे सुंदर गाव वसलेले आहे.महाबळेश्वर येथील एलिफंट हेड म्हणजेच केट्स पॉइंटच्या पायथ्याशी  वसलेल्या गावाला निसर्गाचे जणू वरदानच मिळाले आहे. वयगावपासून पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर बलकवडी धरण आहे.हे कृष्णेवरचे पहिले धरण आहे.त्यानंतर आठ-दहा किलोमीटरवर धोम हे दुसरे धरण लागते. बलकवडी धरण परिसर म्हणजे साक्षात निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या कृष्णा नदीने वयगाव गोळेगाव परिसरात कड्यावरून खाली उडी मारली आहे.सह्याद्रीच्या दोन्ही रांगांमध्ये कृष्णामाईचे बाल्यावस्थेतील नटलेले सौंदर्य पाहायला मिळते.एका बाजूला महाबळेश्वर,तर दुसऱ्या बाजूला कमळगडची डोंगररांग. बलकवडी धरणाच्या बॅकवॉटरला कुरणांवर जाऊन मनसोक्...