मला लाभलेलं अनोखं पितृछत्र
*मला लाभलेलं अनोखं पितृछत्र* "काय अंगणवाडी सेविका का ?" आमच्या नात्यातील पहिले वाक्य --- मी हसूनच उत्तर दिले. नाही, प्राथमिक शिक्षिका. मनात विचार आला कोण आहे ही व्यक्ती असे अचानक येऊन मला असे विचारले ते. काही वेळाने उत्तर मिळाले केंद्र शाळा वलवण दाजीपूर मध्ये नवीन शिक्षक हजर झालेत. श्री संभाजी गोविंद पाटील. आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. किंवा आपल्या ला हवीहवीशी असणारी सगळीच लोक आपल्या सोबत राहत नाहीत, म्हणून आपण देवावर खूप नाराज असतो, जशी की मी, इयत्ता 6 वी मध्ये असताना माझे वडिल मला सोडून गेले. पण एकत्र कुटुंबपद्धती असल्याने माझे चुलते श्री रामराव विष्णु पोवार यांनी मला ती पोकळी कधी जानवू दिली नाही, पण नियतीला तेही मान्य नव्हते व 19 जानेवारी 2014 साली मध्ये ते पण मला सोडून अचानक गेले. त्यानंतर मी देवावर पुर्णत: रागातच होते. पण देव कधीच कुणावर इतका अन्याय करत नाही. आणि त्याने लगेचच 2015 मध्ये माझ्या आयुष्यात पाठवले ते म्हणजे श्री संभाजी पाटील सर. माझ्या आयुष्यातली पोकळी भरुन काढण्यासाठी. आपण कोणत्याच व्यक्तीशी क...