Posts

बुद्ध जयंती

 उद्या असणाऱ्या गौतम बुद्ध जयंतीनिमित्त लेख.. *जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज!* -----------------------------                                             -डॉ.श्रीमंत कोकाटे -----------------------------                              तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ईसपू. 563 साली लुम्बिनी या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुध्दोदन तर आईचे नाव महामाया होते. मातेचे सातव्या दिवशी निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ मावशी तथा सावत्र माता गौतमीने अत्यंत प्रेमाने केला. बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते. *अशक्य कार्य सिद्धीस नेणारा म्हणजे सिद्धार्थ होय*. तसेच त्यांना *भगवा* या नावानेदेखील ओळखले जात असे. भगवा म्हणजे महान. भगवा हा पाली भाषेतील शब्द आहे. कारुण्य आणि प्रेम यांनी त्यांचे व्यक्तिमत्व ओतप्रोत भरले होते.                      सिद्धार्थला त...

प्रत्येक गुरुजींनी संभाजी पाटील बनावं

 राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मा.संभाजी पाटील सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आज प्रकाशित झालेल्या *'प्रेरणास्त्रोत'* या गौरव अंकात प्रकाशित झालेला लेख _________________________ *प्रत्येक गुरुजीने संभाजी पाटील बनावं !* ✍️ श्री.सचिन देसाई _________________________                ऐंशीच्या दशकात शिक्षकी पेशात रुजू झालेले हे वंदनीय गुरुG आज 5G च्या जमान्यात निवृत्त होत आहेत. या मागील चार दशकात काळ  बदलला, प्रवाह बदलले, जीवन बदलले शिवाय शिक्षण व शिक्षणाच्या पद्धतीही बदलल्या. बदलाची ही क्रांतिमय नांदी घडत असताना सुद्धा बदलाच्या प्रत्येक टप्प्यात काळपरत्वे स्वतःलाही बदलत... प्रसंगी सिद्ध करत यशाच्या अश्वमेघावर अविरत स्वार होऊन दिव्यत्वाची पताका फडकवत ,अखंडितपणे शिक्षणाच्या वाटेवर चाललेली ही घोडदौड या सर्वाचा साक्षीदार असणाऱ्या त्या काळाचा आदेश मानत ,आता मात्र थोडा विसावा घेणार आहे. प्रवासाच्या या अंतिम क्षणी या वाटसरुला मागे वळून एक कटाक्ष टाकताना... या सर्वश्रेष्ठ शिक्षणाच्या मैदानात त्यांच्याच सोनपावलांनी  उधळलेला धुरळा पाहताना किती मनस्...

My Guardian Angel

 *MY GUARDIAN ANGEL * Dear pappa  I am little anxious as I am writing this as I have not written about you in a long time , almost dating back to the essay I wrote back in school days.       Few things words can expound better !  Pappa you will soon retire from your service life , a life you have been living since you were 20years old . It’s been 38 years since, and a lot has changed in these years and yet lot of things are same as ever . I still remember the days you took me school with you (Pandewadi), I was only four years old and sat with class of first standard students . I could easily deduce  how well respected you were , among students as well as teachers based on the way I was treated by both of them . You encouraged me to participate in almost every event taking place in school or outside , be it athletics or educational. Well , not just me . I think most of your students would say the same thing about you ! Bringing out the best in peop...

आठवणीतले गुरूजी

 आठवणीतले गुरुजी.... गुरुजी हा शब्द काळानुसार सर, टीचर या मध्ये बदलेलेला असला तरी आमच्या मनावर तो अनेक अर्थाने प्रतिबिंबित झालेला आहे. हा शब्द म्हणजे आमचा आदर्श, आमची ऊर्जा, आमचा आत्मविश्वास आणि बरच काही. आई वडीलांनी बोलायला, चालायला शिकवल्या नंतर खऱ्या अर्थाने ज्ञानाची ज्ञानज्योत घेऊन आम्हाला मार्गक्रमण करायला शिकवले ते आमचे  गुरुजी म्हणजेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री संभाजी गोविंद पाटील (गुरुजी).  आयुष्याला आकार देणारी, योग्य पैलू पाडणारी वर्षे म्हणजेच आपली प्राथमिक शाळेतील वर्षे. अगदी त्याच पहिल्या प्रवासात म्हणजे पहिली ते सातवी (सन १९९०-१९९७) अशी तब्बल सात वर्षे आम्ही गुरूजींकडे शिकलो. गुरुजींचे आमच्या बॅच वर विशेष प्रेम होते. अर्थात याला आम्ही आमचे भाग्य समजतो. घरापेक्षा जास्त वेळ शाळेत असल्यामुळे या सात वर्षात कुटुंबियांपेक्षा जास्त सहवास आम्हाला गुरुजींचा लाभला. शिक्षण, खेळ, राजकारण, समाजकारण या सगळ्याचे बाळकडू आम्हाला लहानपणापासून गुरुजींकडून मिळाले आणि तीच शिदोरी सोबत घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत.  गुरुजींचे अनेक गुण आम्ही अगदी जवळून पहिले. प्रत्येक खे...

परीसस्पर्श

 परीस स्पर्श वर्ष १९९६-९७. इयत्ता चौथी. माझ्या शालेय जीवनातला सर्वात महत्वाचा टप्पा. श्री संभाजी पाटील सर माझे वर्गशिक्षक म्हणून आले. ते वर्ष मी आजही अनुभवत असलेल्या यशाचा पाया होता. सर आम्हाला सुट्टीच्या दिवशी त्यांच्या घरी extra classes साठी बोलवायचे. स्पष्टच होतं की, त्यांनी आपल्या वैयक्तिक वेळेचा त्याग तेव्हापासूनच केला होता. काकी (त्यांच्या पत्नी) आम्हाला नाश्ता आणि चहा देत. शिक्षण विनामूल्य! चहा नाश्ता विनामूल्य!! सुट्टीच्या दिवशी!!! आजच्या व्यावसायिक युगात हे दुर्लभ झालंय. ही त्यांच्याकडून आणि काकींकडून एक निःस्वार्थ सेवा होती. किंबहुना तपश्चर्याच होती. २५ वर्षांनंतरही मला आमचे शालेय दिवस आठवतात. विशेषत: आमचा इतिहासचा वर्ग. सर इतिहास जिवंत करायचे. छत्रपती शिवाजी महाराज आम्ही वर्गातच अनुभवायचो. शाहू महाराजांचा पोवाडा मला आजही पाठ आहे. विज्ञानात सरांचा केवळ पुस्तकांमधून शिकवण्यापेक्षा practical वर भर असायचा. गणित तर त्यांचा आवडता विषय. गणित शिकवताना त्यांच्यात प्रचंड उत्साह असायचा. या विषयाबद्दलची त्यांची आवड संसर्गजन्य होती आणि त्यांनी आम्हाला शिकवलेलं गणित आजही माझ्यासाठी एक...

चिरतरुण व्यक्तिमत्त्व

 **चिरतरुण व्यक्तिमत्त्व**           आज मी वयाची साठी पूर्ण करणार, माझ्या कामातून निवृत्त होणार आणि राहिलेले आयुष्य मस्त निवांतपणे घालवणार. आतापर्यंत जगलेल्या धावपळीच्या आयुष्याला थोडीशी विश्रांती देणार. सकाळी उठून मी चहा घेत वृत्तपत्र वाचत आराम खुर्चीत दारामध्ये सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये दिवसाची सुरुवात करणार. दुपारी जेवण झाल्यावर मस्तपैकी एक डुलकी काढणार आणि संध्याकाळी गावामध्ये एक फेरफटका मारून येऊन जेवून झोपी जाणार. अशी दिनचर्या असणारी किंवा अशा दिनचर्येची स्वप्ने बघणारा एक वर्ग या समाजामध्ये असतो. बहुदा ९९ टक्क्यांपेक्षा जास्त नोकरदार लोक या वर्गामध्ये मोडतो.                    पण ज्या व्यक्तीबद्दल मी चार शब्द लिहिण्याचा जो काही छोटासा प्रयत्न करत आहे ती मात्र उरलेल्या एक टक्क्यांमध्ये मोडते. त्या राहिलेल्या एक टक्क्यांमधले ज्यांच्या वयाचा फक्त आकडा जास्त आहे पण मन, शरीर  अंगात असणारी ऊर्जा आणि सळसळता उत्साह अजूनही तरुणांनाच काय पण शाळेतील मुलांनाही लाजवेल असे असणारे बाबा आता निवृत्त होणार आहेत...

शिक्षक आमचे आधारस्तंभ

 *शिक्षक आमचे आधारस्तंभ*        *गुरु हे शिष्याला सदैव ज्ञान देत असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच एकमेव तळमळ व इच्छा शिक्षकाची असते.सर्व शिक्षक स्वभावाने चांगले असतात.तसेच शिकवण्याची त्यांची धडपड लक्षात राहण्यासारखी असते. प्रत्येक विद्यार्थ्याला कोणते ना कोणते तरी शिक्षक आवडत असतात.माझ्या प्राथमिक शाळेत असेच एक शिक्षक होते. त्यांचे नाव श्री. संभाजी गोविंद पाटील.चहाची जशी वेळीअवेळी आठवण येते, तशीच पाटील सरांची आज नेहमी आठवण येते.*  *गुरुने दिला ज्ञानरूपी वसा*  *आम्ही चालवू हा पुढे वारसा..* *या दोन ओळींमध्येच खरा अर्थ भरला आहे. सरांची शिकवण्याची हातोटी एकदम वेगळी. अवघड गणित अगदी सहजपणे शिकवण्यात त्यांचा हातखंडाच होता. सरांची स्वभाव वैशिष्ट्ये बोलून आणि सांगून न संपणारी आहेत स्वभावाने शांत व मीतभाषी कधी कधी विनोदी पद्धतीने शिकवणारे पाटील सर विद्यार्थ्यांच्याकडून हसत खेळत स्वाध्याय पूर्ण करून घेत बोलण्याची शैली अतिशय सुंदर त्यामुळे ते विद्यार्थी प्रिय झाले.*     *सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग मोठा होता. गावातील सर्वच उपक्रम ...