प्रत्येक गुरुजींनी संभाजी पाटील बनावं
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मा.संभाजी पाटील सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आज प्रकाशित झालेल्या *'प्रेरणास्त्रोत'* या गौरव अंकात प्रकाशित झालेला लेख _________________________ *प्रत्येक गुरुजीने संभाजी पाटील बनावं !* ✍️ श्री.सचिन देसाई _________________________ ऐंशीच्या दशकात शिक्षकी पेशात रुजू झालेले हे वंदनीय गुरुG आज 5G च्या जमान्यात निवृत्त होत आहेत. या मागील चार दशकात काळ बदलला, प्रवाह बदलले, जीवन बदलले शिवाय शिक्षण व शिक्षणाच्या पद्धतीही बदलल्या. बदलाची ही क्रांतिमय नांदी घडत असताना सुद्धा बदलाच्या प्रत्येक टप्प्यात काळपरत्वे स्वतःलाही बदलत... प्रसंगी सिद्ध करत यशाच्या अश्वमेघावर अविरत स्वार होऊन दिव्यत्वाची पताका फडकवत ,अखंडितपणे शिक्षणाच्या वाटेवर चाललेली ही घोडदौड या सर्वाचा साक्षीदार असणाऱ्या त्या काळाचा आदेश मानत ,आता मात्र थोडा विसावा घेणार आहे. प्रवासाच्या या अंतिम क्षणी या वाटसरुला मागे वळून एक कटाक्ष टाकताना... या सर्वश्रेष्ठ शिक्षणाच्या मैदानात त्यांच्याच सोनपावलांनी उधळलेला धुरळा पाहताना किती मनस्...